Fatty liver symptoms : यकृत हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे, पचनक्रियेस मदत करणे, पोषक तत्त्वांवर प्रक्रिया करणे व ऊर्जा साठवणे यांसारखी अनेक कार्ये करीत असतो. म्हणूनच जेव्हा यकृताचे आरोग्य बिघडते, तेव्हा शरीरात विविध बदल दिसून येतात. शरीरातील प्रत्येक अवयवाचे स्वतःचे महत्त्व असते आणि लिवर म्हणजे एक असा अवयव आहे, ज्यामुळे शरीरात विषाक्त पदार्थ बाहेर फेकणे, ऊर्जा साठवणे, आणि पचनाची प्रक्रिया नियमित ठेवणे शक्य होते. पण, काही कारणास्तव यकृताला धोका पोहोचला किंवा त्याची कार्यक्षमता कमी झाली, तर शरीर वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देऊ लागते. त्यामुळे तज्ज्ञ डॉ. शालिनी सिंग साळुंके म्हणतात की, लोक अनेकदा या लक्षणांना सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. तथापि, सतत दिसणाऱ्या काही विशिष्ट लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक असते.
शरीराला सतत खाज सुटणे
जर तुमच्या शरीराला सतत खाज सुटत असेल आणि क्रीम लावल्यानंतरही आराम मिळत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे यकृताच्या नुकसानीचे लक्षण असू शकते.
तोंडाची दुर्गंधी
तोंडाची दुर्गंधी हे यकृताच्या नुकसानीचेही लक्षण असू शकते. जर सकाळी उठल्याबरोबर तुमच्या तोंडाला विशेषतः दुर्गंधी येत असेल, तर तुम्ही यकृताची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
पोट फुगणे आणि वेदना
फॅटी लिव्हर डिसीजच्या सर्वांत महत्त्वाच्या लक्षणांमध्ये पोट फुगणे आणि उजव्या बाजूला वेदना होणे यांचा समावेश होतो. काही लोकांना शरीरात पाणी साठल्यामुळे पोटात सूज येण्याचा अनुभवदेखील येऊ शकतो. जर पोटाची सूज कायम राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
रात्रीची झोप नीट लागत नाही
लोकांना अनेकदा रात्री कमी आणि दिवसा जास्त झोप येते. झोप घेऊनही त्यांना सतत थकवा जाणवू शकतो. यकृताच्या समस्या हे त्यामागील एक कारण असू शकते. तथापि, केवळ थकव्याच्या आधारावर यकृताच्या आजाराचे निदान करता येत नाही.
अन्न पाहिल्यावर मळमळणे
यकृताच्या समस्या असलेल्या काही लोकांना भूक न लागण्याचा अनुभव येऊ शकतो. त्यांना जेवणानंतर मळमळ, उलट्या किंवा विचित्र संवेदनांचा अनुभवदेखील येऊ शकतो. ही लक्षणे इतर अनेक आरोग्य समस्यांमध्येही आढळू शकतात; परंतु ती यकृताच्या आजारात विशेषत्वाने आढळतात.
