scorecardresearch

वारंवार तहान लागणे असू शकते ‘या’ गंभीर आजाराचे लक्षण; वेळीच सावध व्हा आणि…

वारंवार तहान लागण्यामागे काय आहे कारण जाणून घ्या…

Feel thirsty very often Heres what it indicates
वारंवार तहान लागणे असू शकते या गंभीर आजाराचे लक्षण; वेळीच सावध व्हा आणि… (photo – freepik)

तहान लागणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. डॉक्टरांकडूनही वारंवार सांगितले जाते की, रोज भरपूर पाणी प्या; जेणेकरून आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही, तसेच त्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासूनही दूर राहू शकाल. कारण- शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास डिहायट्रेशनसह अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे रोज योग्य प्रमाणात पाणी प्यायलेच पाहिजे. पण, असेही काही लोक आहेत की, ज्यांना वारंवार तहान लागते; जर तुमच्या बाबतीतही अशी काही तक्रार असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण- हे एका गंभीर आजाराचे लक्षण ठरत आहे.

डॉक्टरांकडून ठळकपणे सांगितले जाते की, भारतातील अनेक तरुणांना जास्त तहान लागते; जी पॉलिडिप्सिया नावाची आरोग्य समस्या मानली जाते.

why high blood sugar and blood pressure are a risky mix here what you need to check what doctor said read
उच्च रक्तदाबासह मधुमेह असल्यास सावधान! वेळीच काळजी घ्या अन् डॉक्टरांचे ‘हे’ उपाय करा फॉलो
how many times you can eat antibiotics
सर्दी-तापासह किरकोळ आजारासाठी अँटीबायोटिक्स घेणे थांबवा; मनाप्रमाणे औषधांचा वापर करणे ठरू शकते धोकादायक! कारण…
CTET Result 2023
प्रतीक्षा संपणार! सीटीईटी निकालाबाबत समोर आली मोठी अपडेट; निकाल कधी लागणार? जाणून घ्या
Diabetes And Travel 11 Tips For Managing Your Blood Sugar Levels On The Go
Diabetes And Travel : मधुमेहींनी प्रवासात कशी घ्यावी स्वत:ची काळजी, जाणून घ्या सोप्या टिप्स

रुबी हॉल क्लिनिकमधील औषध आणि मधुमेह विभागाचे प्रमुख डॉ. संजय अग्रवाल यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, वैद्यकीयदृष्ट्या जास्त तहान लागण्याचे लक्षण पॉलिडिप्सिया या नावाने ओळखले जाते; ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. विशेषतः तरुण, प्रौढांमध्ये हे लक्षण सर्वाधिक प्रमाणात दिसून येत आहे.

तहान वाढण्यामागे विविध कारणे असू शकतात; परंतु ते प्री-डायबेटिससारख्या आजाराचे मुख्य कारण ठरत आहे, असेही डॉ. संजय अग्रवाल म्हणाले.

डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट व एचओडी- जेरियाट्रिक मेडिसिन, डॉ. अनु गायकवाड यांनी सांगितले की, जास्त प्रमाणात तहान लागणे हे प्री-डायबेटिसच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. त्यासोबत काहींना जास्त भूकही लागते. तसोच जर रुग्णाला जास्त प्रमाणात तहान लागत असेल, तर आपल्याला त्यामागील कारणे तपासावी लागतील. त्यात रुग्ण खरोखरच प्री-डायबेटिस आहे का हे जाणून घेण्यासाठी त्याच्या रक्तातील साखरेची पातळी तपासावी लागेल.

प्री-डायबेटिस म्हणजे काय?

प्री-डायबेटिसमध्ये व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते; पण त्याला मधुमेह, असे म्हणू शकत नाही. प्री-डायबेटिस म्हणजे रक्तातील साखरेची (ग्लुकोज) पातळी शरीरातील सामान्य साखरेच्या पातळीपेक्षा जास्त असणे; पण मधुमेहात ज्या प्रकारे रक्तातील साखरेची पातळी वाढते, तितकी प्री-डायबेटिसमध्ये नसते. प्री-डायबेटिसमुळे मधुमेह नाही; पण ‘टाईप २’चा मधुमेह होण्याचा धोका वाढतो. अशा अवस्थेत जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते, तेव्हा शरीर लघवीद्वारे जास्तीची साखर काढून टाकण्याचा प्रयत्न करते; ज्यामुळे एकाच वेळी शरीरातील भरपूर पाणी बाहेर जाते.

या प्रक्रियेचा परिणाम सौम्य डिहायड्रेशनमध्ये होतो; ज्यामुळे प्रभावित व्यक्तींमध्ये तहान वाढते. उपाशीपोटी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासा. जर हे प्रमाण १०० पेक्षा जास्त असेल; परंतु १२५ पेक्षा कमी असेल, तर त्याला प्री-डायबेटिस म्हणतात. तुम्ही ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिनदेखील तपासू शकता. तीन महिन्यांत जर सरासरी साखरेची पातळी ५.७ पेक्षा जास्त आणि ६.३ पेक्षा कमी असेल, तर तुम्हाला प्री-डायबेटिस आहे, असे म्हणता येईल, असेही डॉ. अनु गायकवाड म्हणाल्या.

तुम्हाला जास्त तहान का लागते?

खूप तहान लागणे आणि प्री-डायबेटिस यातील संबंध ओळखून, त्यावर लवकर प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे.

डॉ. संजय अग्रवाल यांच्या मते, मानवी शरीर इष्टतम कार्य सुनिश्चित करण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. पण जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते, तेव्हा मूत्रपिंडे मूत्रमार्गे अतिरिक्त ग्लुकोज बाहेर टाकण्याचे काम करतात.

या प्रक्रियेमुळे लघवीचे उत्पादन वाढते; ज्यामुळे निर्जलीकरण होते आणि तीव्र स्वरूपाची तहान लागते.

प्री-डायबेटिसमध्ये शरीरातील इन्सुलिनच्या कार्यात गडबड होऊ शकते; ज्यामुळे ग्लुकोज चयापचय बिघडते. परिणामी, ग्लुकोज रक्तप्रवाहात जमा होते आणि मूत्रपिंडांना ते लघवीद्वारे काढून टाकण्यास प्रवृत्त करते.

वाढलेली ग्लुकोज पातळी आणि जास्त लघवीचे हे चक्र सतत तहान लागण्यास कारणीभूत ठरू शकते; जे बऱ्याचदा प्री-डायबेटिस स्थितीच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे.

तरुण व प्रौढांना जास्त तहान लागण्यामागची इतर अनेक कारणे :

१) डिहायड्रेशन

दररोज योग्य प्रमाणात पाणी न पिणे, खूप घाम येणे किंवा ताप येणे यामुळे जास्त तहान लागू शकते.

२) औषधे

काही औषधांमध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारे काही घटक असतात; ज्यामुळे सतत लघवी होते आणि जास्त तहान लागते.

३) मधुमेह

मधुमेह ही एक गंभीर स्थिती आहे; ज्यामध्ये तुमचे शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करीत नाही किंवा इन्सुलिन प्रभावीपणे वापरत नाही.

४) इतर वैद्यकीय परिस्थिती

किडनी रोग किंवा यकृत रोग अशा स्वरूपाच्या शारीरिक स्थितींमुळेही जास्त तहान लागू शकते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Feel thirsty very often heres what it indicates sjr

First published on: 21-11-2023 at 13:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×