हल्ली अनेक लोकांमध्ये सतत थकवा जाणवण्याची समस्या पाहायला मिळत आहे. खरंतर, यामागे अनेक कारणे आहेत. सर्वात पहिले आणि मुख्य कारण म्हणजे शारीरिक कमजोरी किंवा झोप पूर्ण न होणे. यामुळे सतत थकवा जाणवतो. जर तुम्हालाही सतत थकवा जाणवत असेल, तर हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. आज आपण अशा काही टिप्स जाणून घेऊया ज्यामुळे तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

खालील कारणांमुळे जाणवतो थकवा :

  • जेव्हा आपण हायड्रेटेड नसतो तेव्हा आपले शरीर नेहमी थकल्यासारखे वाटते. उन्हाळ्यात, तुम्हाला ही समस्या अधिक जाणवते. म्हणूनच उन्हाळ्यात तुम्ही तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवावे. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे तुमचा थकवा दूर होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.
  • जर तुम्ही निरोगी आहार घेत नसाल तर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. अशा परिस्थितीत जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न न खाण्याचा प्रयत्न करा.

तुम्हीही ‘या’ पद्धतीने पाणी पिता का? आजच करा सवयीमध्ये बदल; अन्यथा होऊ शकते नुकसान

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Video Rice Papad Marathi Recipe In Cooker Becomes Four Times After Frying Khichiya Papad Dough Making Papad Khar At Home
कुकरच्या एका शिट्टीत बनवा तांदळाच्या पिठाचे चौपट फुलणारे पापड, लाटायची गरजच नाही, बघा सोपा Video
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स
  • तुमच्या शरीरात काही आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असली तरी तुम्हाला दिवसभर थकवा जाणवेल. वास्तविक, जेव्हा शरीरात व्हिटॅमिन-डीची कमतरता असते तेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो.
  • तसेच पुरेशी झोप घेतली नाही तरी दिवसभर थकवा जाणवतो. खरं तर, झोपेच्या वेळी, तुमचे शरीर आवश्यक संप्रेरक सोडते, ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी उत्साही वाटते.

थकवा घालवण्यासाठीचे उपाय :

  • शरीरातील ऊर्जा कमी होत आहे असे जेव्हा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कॅफिनयुक्त पेये घेऊ नये.
  • थकवा घालवण्यासाठी किंवा एनर्जीसाठी फक्त कर्बोदकांचेच सेवन करू नये, तर काही हेल्दी फूड कॉम्बिनेशन्सचा पर्याय तुम्ही निवडू शकता.
  • याशिवाय तुमच्या आहारात भरपूर पोषक तत्वांचा समावेश करा.
  • अधिकाधिक पाणी प्या. यामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा टिकून राहते.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.)