Fenugreek Water For Skin: अनेक वर्षांपासून भारतात प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात मेथीचा वापर केला जातो. मेथी आरोग्य आणि सौंदर्य अशा दोन्हीसाठी रामबाण उपाय मानली जात आहे. पूर्वीचे लोक कायम सांगत की, मेथी लहान आहे पण खूप गुणकारी आहे आणि ते खरंही आहे. हे लहान दाणे केवळ स्वयंपाकाची चव वाढवत नाहीत, तर आरोग्यासाठीदेखील फायदेशीर असतात. मेथीमध्ये जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि दाहकविरोधी घटक भरपूर असतात, जे शरीराला आतून मजबूत करतात आणि त्वचेचे सौंदर्य वाढवतात. हिवाळ्यात त्याचा वापर आणखी फायदेशीर असतो. तुमच्या रोजच्या आहारात पाण्यात भिजवून प्या किंवा चेहऱ्यावर लावा.
आयुर्वेदातही मेथीला त्वचा तरूण आणि शरीर निरोगी ठेवणारे मौल्यवान दाणे म्हटले आहे. ते हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करते, रक्त शुद्ध करते आणि त्वचेची नैसर्गिक चमक पुनर्संचयित करते. मेथीचे पाणी नियमितपणे प्यायल्यानेचेहरा उजळतो, चेहऱ्यावरील डाग हलके होतात आणि त्वचा मऊ आणि चांगली राहते. मेथीचे पाणी प्यायल्याने तुमच्या त्वचेच्या सर्व समस्या कशा सोडवता येतील हे जाणून घ्या…
मेथीचे पाणी कसे बनवावे?
एक कप पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर भिजवा. सकाळी पाणी गाळून घ्या आणि ते रिकाम्या पोटी प्या. यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि करूण दिसेल. याव्यतिरिक्त तुम्ही भिजवलेले मेथीचे दाणे बारीक करून फेस पॅकही तयार करू शकता. यामुळे त्वचा मऊ आणि ताजीतवानी दिसते.
त्वचेसाठी मेथीचे फायदे
१. पिंपल्स कमी करते- मेथीमध्ये अशी संयुगे असतात, जी बॅक्टेरिया आणि संसर्गाशी लढतात. यामुळे मुरूमे, पिंपल्स आणि डाग कमी होण्यास मदत होते.
२. त्वचेचा रंग उजळतो- दररोज मेथीचे पाणी प्यायल्याने चेहरा अधिक स्वच्छ आणि ताजा दिसतो. डाग आणि निस्तेजपणा हळूहळू कमी होतो.
३. त्वचेवरील नैसर्गिक चमक- मेथीचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते, त्यामुळे चेहरा आतून निरोगी आणि बाहेरून चमकदार दिसतो.
४. सुरकुत्या आणि वृद्धत्व रोखते- मेथीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचा घट्ट ठेवतात आणि सुरकुत्या रोखतात.
५. त्वचेची जळजळ, लालसरपणा कमी करते- जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर मेथीचा थंडावा खाज आणि जळजळ कमी करतो.
६. त्वचा हायड्रेटेड ठेवते- मेथीमध्ये नैसर्गिक ओलावा असतो, जो तुमची त्वचा मऊ आणि मॉइश्चराइज ठेवतो.
७. हार्मोन्स आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत- मेथीचे पाणी शरीरातील अशुद्धता काढून टाकते आणि हार्मोन्स संतुलित करते, त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि चमकदार दिसतो.
मेथीचे पाणी घेताना काय काळजी घ्याल?
१. सुरूवातीला मेथीच्या पाण्याचे प्रमाण कमी ठेवा. कारण जास्त वापरामुळे पोट खराब होऊ शकते.
२. चेहऱ्यावर लावण्यापूर्वी नेहमीच पॅच टेस्ट करा.
३. गर्भवती महिला किंवा डाळी तसंच शेंगांची अॅलर्जी असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
४. भिजवलेले मेथीचे दाणे जास्त काळ वापरू नये, ते कुजू शकतात.
