असे तर सर्व ड्रायफ्रूट्स हे वेगवेगळ्या औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. परंतु अंजीर हे एक असे ड्रायफ्रूट आहे ज्यात झिंक, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. अँटी-ऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध असणाऱ्या अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते. खास करून टाईप २ मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी अंजीरचे सेवन करणे अतिशय फायदेशीर असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंजीरचे सेवन केल्याने मधुमेह असणारे रुग्ण रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करू शकतात. अंजीर खाल्ल्याने पोटाच्या समस्यांपासून देखील आराम मिळू शकतो. फायबरने समृद्ध अंजीर पचन व्यवस्थित ठेवते, तसेच बद्धकोष्ठता दूर करते.

ओमायक्रॉन संक्रमणापासून बचाव करायचा आहे? तर ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश कराच

अंजीर खाण्याचे फायदे :

हाडे मजबूत करते :

अंजीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण देखील जास्त असल्याने त्यांच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. आपण दररोज दुधासोबत अंजीरचे सेवन करू शकतो. तसेच, याच्या सेवनाने दात आणि स्नायू देखील मजबूत होतात. गुढग्याच्या दुखण्यावर हे प्रभावी आहे, सोबतच अंगातील सूज कमी करण्यास देखील गुणकारी आहे.

सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय

हिवाळ्यामध्ये सर्दी-खोकल्यासारख्या आजारांनी हैराण असाल तर अंजीरचे सेवन करा. याने खोकला, घसादुखी आणि ताप यांसारख्या समस्या दूर होतात. ५ अंजीर पाण्यात उकळून हे पाणी गाळून सकाळ-संध्याकाळ गरम-गरम प्यायल्याने थंडीत फायदा होऊ शकतो.

थायरॉइडचा त्रास आहे? मग त्वरित बंद करा ‘या’ भाज्यांचा आहारातील समावेश

रक्तदाब नियंत्रणात आणते

कमी पोटॅशियम आणि अधिक सोडियममुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. अंजीरात पोटॅशियम जास्त आणि सोडियमचे प्रमाण कमी असल्याने हे उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यात प्रभावशाली आहे.

बद्धकोष्ठता दूर करते

अंजीर दुधात उकळून प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. भिजवलेल्या अंजीराचे दूध प्यायल्याने आणि अंजीर चावून खाल्ल्याने काही दिवसातच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळेल.

दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर

दम्याच्या रुग्णांनी अंजीराचे सेवन केल्यास कफपासून आराम मिळतो. अंजीर कफ सहज काढून टाकते. २ ते ४ सुके अंजीर दुधात गरम करून सकाळ संध्याकाळ घेतल्याने कफ कमी होतो.

Health Tips: हिवाळ्यात घरी करून बघा ‘हे’ चविष्ट लाडू; आरोग्यासाठी आहेत भरपूर फायदेशीर

मूळव्याध असलेल्या रुग्णांसाठी प्रभावी

ज्यांना मूळव्याधचा त्रास आहे त्यांनी अंजिराचे सेवन करावे. ३-४ सुके अंजीर संध्याकाळी पाण्यात टाकून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास मूळव्याध निघून जातो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Figs are great for controlling high blood pressure and diabetes learn the benefits pvp
First published on: 18-01-2022 at 11:01 IST