Gmail हे जगातील सर्वात लोकप्रिय E-mail सेवांपैकी एक आहे. जगभरातील असंख्य लोक या प्लॅटफॉर्मचा अत्यंत मोठ्या प्रमाणात वापर करतात. तुमच्यापैकी देखील अनेक जण जीमेल वापरत असतील. पण तुम्हाला हे माहिती आहे का? कि, जीमेल हे आपल्याला काही अत्यंत उपयुक्त आणि स्मार्ट फीचर्स देतं ज्यामुळे आपलं काम आणखी सोपं आणि सुरळीत होऊ शकतं. आता इतक्या प्रमाणात लोक या प्लॅटफॉर्मशी जोडले गेलेले असूनही हे काही स्मार्ट फीचर्स बहुतेक युझर्सना अद्याप माहित नाहीत असं एकंदर लक्षात येतं. म्हणून आज आपण जीमेलच्या अशाच काही फीचर्सबद्दल जाणून घेणार आहोत. तर पाहूया या स्मार्ट फीचर्सच्या मदतीने जीमेलवरचं आपलं काम सोपं कसं करता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) स्मार्ट कंपोझ

स्मार्ट कंपोझ हे फिचर युझर पुढे काय टाइप करणार आहे याचा अंदाज लावतं. हेच अंदाज लावलेलं संपूर्ण वाक्य किंवा शब्द वापरण्याची परवानगी देतं. हे फिचर संगणकावर मेल टाईप करताना ‘टॅब की’चा वापर करून किंवा स्मार्टफोनवर प्रेडिक्टेड वाक्याच्या शेवटी असलेल्या ब्लँक स्पेसमध्ये टॅप करून वापरलं जातं. तुम्ही तुमच्या जीमेल सेटिंग्जमधून हे फीचर ऑन करू शकता. यासाठी तुम्ही उजव्या कोपऱ्यात वर दिसणाऱ्या जीमेल सेटिंग्जमध्ये जा आणि जनरल टॅबमधील ऑप्शन्स स्क्रोल करा. या ऑप्शन्समध्ये तुम्हाला ‘स्मार्ट कंपोझ’ दिसेल. तिथे जाऊन तुम्ही हे फीचर ऑन करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Find out 5 smart hidden features of gmail you never knew about gst
First published on: 07-08-2021 at 10:40 IST