मध्यभारतातील लोखंडाशिवाय बांधलेले पहिले विटांचे छत नागपुरात

व्यापक उपयुक्ततेमुळे उथळ घुमटाकार छताची योजना

व्यापक उपयुक्ततेमुळे उथळ घुमटाकार छताची योजना

नागपूर : पर्यावरणपूरक घर म्हणजे फक्त माती, कवेलू, बांबू वापरून बनवलेले घर असा अनेकांचा गैरसमज आहे. या गैरसमजात अडकू न अनेकजण पर्यावरणपूरक घरपद्धती नाकारतात. मात्र, लोखंडाच्या जाळीचा वापर करून अधिक मजबूत के लेल्या बांधकामापेक्षा (आरसीसी) उथळ घुमटाकार विटांचे छत पर्यावरणपूरक आहे. मध्यभारतातील लोखंड आणि सिमेंटशिवाय बांधलेले पर्यावरणपूरक छत आणि घर उपराजधानीत तयार होत आहे.

पर्यावरणविपरीत वस्तूंचा मोजका वापर करत उभारण्यात येत असलेल्या राज्य वस्तू व सेवा कर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्याम रघुते यांच्या या वास्तूत पर्यावरणाला हानीकारक ठरणारे लोखंड, सिमेंट, वाळू यांचा वापर न करता त्याचे पर्याय वापरण्यात आले आहे. उथळ घुमटाकार छत के वळ पारंपरिक म्हणून न करता त्याच्या व्यापक उपयुक्ततेमुळे उभारण्यात आले आहे. भारतात लोखंडाच्या जाळीचा वापर करून अधिक मजबूत के लेल्या बांधकामाचा (आरसीसी) पर्याय येण्याआधी उपलब्ध असलेल्या सपाट छतांच्या अनेक पर्यायांपैकी हा एक होता. हरियाणा तसेच पश्चिम उत्तरप्रदेशात लोखंडाशिवाय बांधलेल्या उथळ घुमटाकार विटांच्या छताचा किफायतशीरपणा त्यांच्या बांधकामातील अंगभूत सौंदर्यात दडला आहे. सौम्य वक्रोकार डिझाईनमुळे खर्चिक असे ‘प्लास्टर फॉल्स सिलिंग’ यात गरजेचे नाही. यात सिमेंट आणि वाळूची सुमारे २० टक्के  बचत झाली आहे. सेंट्रिंगला साधारणपणे २१ दिवसांचा कालावधी लागतो, पण या पद्धतीने छत उभारणी के ल्यास काम करताना उभे राहण्यासाठी तात्पुरता बांबूचा पाडाव पुरेसा आहे. त्यामुळे या खर्चातही ५० टक्क्यांपेक्षा अधिक बचत होते. कारागिरांच्या खर्चात वाढ होत असली तरीही पर्यावरणाला बाधा आणणाऱ्या वस्तूंची यात बचत होत असल्याने ते निश्चितच पर्यावरणपूरक आहे.

छत सौम्य वक्राकार असल्यामुळे लोखंडाशिवाय वजन पेलता येईल इतकी मजबुती यात आहे. अर्ध्या विटांमध्ये वक्राकार अधिक अचूक येतो. वीट कोरडी असल्यास वेगाने काम होते. घुमटाकार पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे आठवडय़ाभरात कोपऱ्यांमध्ये विटांचे तुकडे भरून छत वापरण्यायोग्य सपाट करता येते. त्याच्यावर रूम घेणे सहज शक्य आहे. तयार छत सुमारे १५ टन विभाजित वजन घेण्याइतपत मजबूत असते. सिमेंट व गिट्टीचा वापर कमी झाल्याने मिळणारा गारवा बोनस म्हणता येईल.

विटांच्या छतबांधणीचा प्रवास एका लेखातील माहितीवरून सुरू झाला. बंगळुरूचे प्रख्यात आर्किटेक्ट सत्यप्रकाश वाराणसी यांच्या एका लेखमालेत विस्तृत माहिती मिळाली. आर्किटेक्ट राजपाल सिंग यांनी आपल्या घराकरिता हे योग्य असल्याचा विश्वास दिला. कारागिरांचा शोध घेताना ‘हुनरशाला’ची (ग्रामीण गांधकाम कारागिरांना एकत्र आणणारी संस्था) मदत झाली. या कारागिरांच्या मेहनतीसोबतच स्थानिक कारागिरांची चमू आणि कु टुंबीयांनी या प्रयोगाला पाठिंबा दिल्यामुळेच हा प्रयोग यशस्वी ठरला.

– श्याम रघुते, सहाय्यक आयुक्त, वस्तू व सेवा कर विभाग राज्य

पर्यावरणपूरक छतबांधणीची ही अतिशय प्राचीन पद्धत आहे. यात लोखंड, सिमेंटचा वापर अजिबात के लेला नाही. आधी त्याचे रचनात्मक डिझाईन तयार के ले. त्याला मान्यता मिळाल्यानंतरच मग काम सुरू के ले. या घरात पाच खोल्या आहेत आणि पाचही खोल्यांच्या छताचे काम अवघ्या चार दिवसात या पद्धतीने पूर्ण झाले.

– राजपाल सिंग, आर्किटेक्ट

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: First brick roof built without iron in central india is at nagpur zws

Next Story
आता रक्तदाब नियंत्रित करणार हातावरील ‘पट्टी’!
ताज्या बातम्या