शरीर मजबूत होण्यासाठी आणि स्नायूंच्या चांगल्या विकासासाठी पुरेशा प्रमाणात प्रोटीनचे सेवन करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. प्रोटीनचे नाव ऐकताच पहिला विचार अंड्यांचा येतो. पण, अंडी हा या पोषक तत्वाचा सर्वोत्तम आणि सहज उपलब्ध स्त्रोत मानला जातो. १०० ग्रॅम अंड्यातून सरासरी १३ ग्रॅम प्रोटीन मिळू शकतात. दुसरीकडे, आरोग्य तज्ञांच्या मते, प्रौढ पुरुषांना दररोज सुमारे ५६ ग्रॅम आणि महिलांना दररोज ४६ ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. म्हणजेच इतर गोष्टींबरोबरच रोज चार अंडी खाल्ल्यास शरीराची ही गरज सहज पूर्ण होऊ शकते. पण जास्त प्रोटीनच्या नादात तुम्ही खूप जास्त अंडी खात तर नाही ना?

आहारतज्ञांच्या मते शरीराला ठराविक प्रमाणातच पोषक तत्वांची गरज असते. यापेक्षा जास्त नीट पचन होऊ शकत नाही, त्यामुळे यकृत आणि किडनीला अतिरिक्त काम करावे लागते. तसंच अभ्यास दर्शविते की जे लोक जास्त अंडी खातात त्यांना अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा धोका असू शकतो. याविषयी सविस्तर जाणून घेऊया…

कोलेस्टेरॉलची समस्या
अंडी मर्यादित प्रमाणात खाणे फायदेशीर असले तरी त्याचा अतिरेक अनेक गंभीर आरोग्य समस्या वाढवू शकतो. विशेषत: जे लोक जास्त प्रमाणात अंडी खातात त्यांना कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याचा धोका असू शकतो. एका मोठ्या अंड्यामध्ये सरासरी १८६ मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते, तज्ञांनी दिवसाला ३०० मिलीग्रामपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल न खाण्याची शिफारस केली आहे. अशा परिस्थितीत दररोज दोन अंडी खाणे निरोगी शरीरासाठी पुरेसे असू शकते.

पोट फुगण्याची समस्या
जास्त प्रमाणात अंडी खाण्याची सवय तुमच्या पोटाच्या समस्या वाढवू शकते. जे लोक जास्त अंडी खातात त्यांना बद्धकोष्ठता आणि ओटीपोटात सूज येऊ शकते. ठराविक प्रमाणापेक्षा जास्त प्रथिने आणि कोलेस्टेरॉल नीट पचत नाहीत, ज्यामुळे तुम्हाला पोटाच्या अनेक गंभीर समस्यांचा धोका असतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात अंडी खात राहिल्यास त्याचा यकृताच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.

आणखी वाचा : फूड पॉयझनिंगवर ‘हे’ पाच घरगुती उपाय आहेत रामबाण इलाज, उन्हाळ्यापासून बचावासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

मधुमेहींच्या समस्या वाढू शकतात
मधुमेहींमध्ये, प्रथिनांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अंडी खाण्याची शिफारस केली जाते, जरी जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. अंड्यांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते जे जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर विपरीत परिणाम होतो.

जास्त अंडी खाल्ल्याने इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या वाढते. ज्यामुळे तुमची आरोग्याची गुंतागुंत वाढू शकते. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, दररोज दोनपेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने मधुमेहाचा धोका ६०% वाढू शकतो.

त्वचेच्या समस्या
अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. अंड्यांमध्ये प्रोजेस्टेरॉन असते, त्याचे जास्त सेवन केल्याने शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोनचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे तुम्हाला फोड किंवा मुरुमांची समस्या होऊ शकते. अंड्यांचे जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी, त्यांचा वापर कमी प्रमाणात करणे आवश्यक आहे.