शरीर सुदृढ ठेवण्यासाठी पौष्टिक अन्नाचे सेवन करणे आवश्यक मानले जात असले तरी कोणत्या वेळी काय खावे, याचीही माहिती लोकांना असणं गरजेचं असल्याचं आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणं आहे. आहारातील काही पदार्थ खाल्ल्यानंतर घेतल्या जाऊ शकतात, तर काही पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ल्यास अधिक फायदेशीर मानलं जातं. पदार्थांची गुणवत्ता लक्षात घेऊन, ते वेळेवर सेवन करणं देखील आवश्यक आहे.

Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Benefits of Drinking Okra Water
एक महिना ‘हे’ पाणी प्यायल्याने झपाट्याने वजन होईल कमी; कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रणात, एकदा फायदे वाचाच!

संत्र्याचा रस, चहा आणि ब्रेड यांसारख्या न्याहारीच्या पदार्थांचा वापर बर्‍याच घरांमध्ये केला जातो, परंतु सकाळी सर्वात प्रथम खाणं आणि पिणं खरोखरंच आरोग्यदायी आहे का? लिंबू सारख्या फळांमध्ये ऍसिड असतं आणि ते रिकाम्या पोटी खाल्ल्याने छातीत जळजळ आणि ऍसिडिटी होऊ शकते. त्याचप्रमाणे, यीस्टने भरलेली ब्रेड पोटाच्या अस्तरांवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे गॅस्ट्रिक समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया, असे पदार्थ जे रिकाम्या पोटी सेवन केल्‍याने जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो.

गरम पाणी मध मिसळून प्या
सकाळी गरम पाण्यात मध मिसळून पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. मधामध्ये विविध प्रकारचे खनिजे, जीवनसत्त्वे, फ्लेव्होनॉइड्स आणि एंजाइम असतात, जे तुमचे आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. याशिवाय, ते गरम पाण्यात मिसळल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यासाठी गरम पाण्यात मध टाकून सेवन करणे फायदेशीर मानले जाते.

आणखी वाचा : Christmas 2021 : Amazon ची ख्रिसमस ऑफर! प्रीमियम Chacolate वर सर्वात मोठी ऑफर, गिफ्टिंगसाठी ७५% डिस्काउंट

पपई खाणे फायदेशीर आहे
आतडे चांगले ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकतं. वर्षाच्या प्रत्येक हंगामात सहज उपलब्ध होईल अशी पपई तुम्ही तुमच्या नाश्ता म्हणून खावू शकता. पपई केवळ शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी उपयुक्त नाही तर ते खराब कोलेस्टेरॉल देखील कमी करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. मधुमेहींसाठीही पपईचे सेवन फायदेशीर मानले जाते.

आणखी वाचा : Finance Horoscope Singh Rashi 2022 : सिंह राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत राहील, संपत्ती जमा करण्यात ते यशस्वी होतील

सुका मेवा फायदेशीर आहे
नाश्त्यामध्ये मूठभर काजू खाणे आतडे निरोगी ठेवण्यासाठी सर्वात फायदेशीर मानले जाते. यामुळे केवळ पचन सुधारत नाही तर तुमच्या पोटाची पीएच पातळी सामान्य ठेवण्यास देखील मदत करते. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात मनुका, बदाम, काजू आणि पिस्ता यांसारख्या नटांचा समावेश करू शकता. तुम्ही ते कमी प्रमाणात खात असल्याची खात्री करा, कारण जास्त प्रमाणात पिंपल्स आणि वजन वाढू शकते.

(टीप: हा लेख वैद्यकीय अहवालातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे.)