शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. तसंच कोमट पाणी प्यायल्यास त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते. तसंच लघवीचं प्रमाण ही वाढवतं, ज्यामुळे शरीरातील अनावश्यक विषारी पदार्थ बाहेर पडतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दररोज गरम पाणी प्यायले तर ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

अभ्यासानुसार सर्व लोकांनी थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास कोमट पाणी प्यायल्याने तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. जाणून घेऊया अशाच काही फायद्यांविषयी.

Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

रात्री गरम पाणी प्या
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि रक्ताभिसरण सुधारतं. हे पेशींना पोषण देतं आणि शरीराला आतून ताजेतवाने करण्यासाठी पेशींमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील उपयुक्त मानले जाते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने पोटदुखी किंवा वेदना कमी होण्यास मदत होते.

मूड सुधारण्यासाठी फायदेशीर
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने तुमचा मूड चांगला राहतो. २०१४ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, पाण्याची कमतरता तुमच्या मूडवर नकारात्मक परिणाम करू शकते, त्यामुळे जास्त पाणी पिऊन तुम्ही अशा समस्या सहज कमी करू शकता. अभ्यासात असे आढळून आले की जे लोक सर्वसाधारणपणे जास्त पाणी पितात त्यांचा मूड अधिक शांत आणि सकारात्मक असतो.

आणखी वाचा : Tips For Long Hair: लांब सडक आणि दाट केस हवेत? , मग या टिप्स नक्की फॉलो करा!

चयापचय सुधारतं
अभ्यासात असे आढळून आले आहे की गरम पाणी पिल्याने तुमची चयापचय गती वाढते आणि तुमचे वजन निरोगी मार्गाने कमी होण्यास मदत होते. गरम पाणी आपल्या आहारातील चरबीचे रेणू जलद विघटन करण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होते. अशा स्थितीत रात्री जेवल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने असे आरोग्य फायदे मिळू शकतात.

आणखी वाचा : Relationship Tips: महिलांनी या सवयी सुधारल्या पाहिजेत, अन्यथा नातं तुटू शकतं

पचनासाठी चांगले
जेवणानंतर गरम पाणी प्यायल्याने पचनास मदत होते. पचनासह गरम पाणी पिणे देखील रक्त प्रवाह वाढविण्यासाठी, स्नायूंना आराम देण्यासाठी आणि शरीरातील विषारीपणा कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. काही अभ्यासात असे आढळून आले आहे की जे लोक रात्री गरम पाणी पितात त्यांना देखील आम्लपित्त होण्याची शक्यता कमी असते.

(टीप: हा लेख वैद्यकीय अहवालातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे. )