Exercise Gaining Weight Tips : अतिरिक्त वजन किंवा लठ्ठपणा हा आपल्या आरोग्यासाठी मोठा धोका मानला जातो. जसे वजन वाढते, तसतसा विविध आजारांचा धोकाही वाढू लागतो. याच कारणास्तव आरोग्य तज्ज्ञ नेहमी वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला देतात. वजन कमी करण्याचा विचार मनात येताच अनेक जण व्यायामाची वेळ आणि तीव्रता वाढवतात. ‘जितकी जास्त मेहनत, तितके लवकर वजन कमी होईल’ असा समज बहुतेकांचा असतो. पण, आपले शरीर खरोखर याच तत्त्वावर काम करते का? अनेकदा वजन पटकन घटवण्याच्या नादात आपण शरीराला इतके थकवतो की फायद्याऐवजी नुकसानच जास्त होते.
नियमित व्यायामानंतरही वजन का कमी होत नाही?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनेकदा आपण जिममध्ये प्रचंड घाम गाळतो, आहारावर नियंत्रण ठेवतो तरीही वजन कमी होत नाही. अशा वेळी समस्येचे मूळ व्यायामाच्या कमतरतेत नसून, गरजेपेक्षा जास्त वर्कआउट आणि शरीराला विश्रांती न मिळण्यात दडलेले असते.
वर्कआउटनंतर स्नायूंच्या (मांसपेशींच्या) दुरुस्तीसाठी शरीराला पुरेसा वेळ मिळणे गरजेचे असते.
शांत आणि पुरेशी झोप हा या रिकव्हरी प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे.
सतत जास्त व्यायाम करूनही रात्री योग्य झोप मिळाली नाही तर शरीरावर ताण वाढतो.
याचा थेट वाईट परिणाम तुमच्या ऊर्जेवर, भूकेवर आणि दैनंदिन कार्यक्षमतेवर होतो.
अतिव्यायामाचे आरोग्यावर होणारे परिणाम
क्रॉनिक डिसीज तज्ज्ञ आकांक्षा पांडे यांच्या मते, “जितका जास्त व्यायाम तितका जास्त फिटनेस” हा लोकांचा समज चुकीचा ठरू शकतो. अतिव्यायामामुळे मेटाबॉलिझम (चयापचय क्रिया) बिघडू शकते, झोपेचे खोबरे होते आणि संप्रेरकांचे (हार्मोन्सचे) संतुलन बिघडून शरीरात चरबी साचू लागते. मर्यादेबाहेर कसरत केल्यास शरीराची यंत्रणा उलटी फिरू शकते.
विश्रांतीशिवाय वर्कआउट ठरते धोकादायक
रोज न थांबता किंवा विश्रांती न घेता वर्कआउट केल्यास शरीरात ‘क्रॉनिक लो-ग्रेड इन्फ्लेमेशन’ निर्माण होते. हे हळूहळू संप्रेरकांचे संतुलन बिघडवून पोटाभोवती चरबी साठवण्यास सुरुवात करते.
महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होण्याची समस्या
अतिव्यायामामुळे (ओवरट्रेनिंग) अनेक महिलांमध्ये मासिक पाळी न येणे किंवा उशिरा येणे अशा समस्या उद्भवतात. हा शरीराने दिलेला धोक्याचा इशारा असतो. व्यायाम नेहमी शरीराच्या क्षमतेनुसारच करावा. अतिथकव्यानंतरही रात्री झोप लागत नसेल तर त्वरित सावध होणे गरजेचे आहे.
झोपेच्या समस्या आणि मंदावणारे मेटाबॉलिझम
व्यायामाने शरीर थकल्यानंतरही रात्री झोप येत नसेल तर हे ओव्हरट्रेनिंगचे स्पष्ट लक्षण आहे. ताणामुळे ॲड्रिनल ग्रंथी आणि मज्जासंस्थेवर (नर्व्हस सिस्टीम) ताण येतो, ज्यामुळे झोप मोडते. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त वर्कआउट करता, ???तेव्हा शरीर थायरॉईड आणि चयापचय क्रिया मंदावते.??? यामुळे चरबी जळण्याऐवजी (फॅट बर्न) शरीर चरबी साठवू लागते, म्हणूनच वजन घटवण्यासाठी व्यायाम जरूर करा, पण ओव्हरट्रेनिंग टाळा.
