बाजारात नवीन मोबाईल आला की ऑनलाईन शॉपिंग कंपन्या त्यावर एकाहून एक ऑफर्स देत ग्राहकांना आकर्षित करतात. फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलने नुकताच आपला सेल जाहीर केला असून त्यामार्फत ग्राहकांना विविध कंपन्यांच्या मोबाईलवर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. हा सेल १० ऑक्टोबर म्हणजेच आजपासून सुरु होणार असून तो १४ ऑक्टोबरपर्यंत आहे. भारतात काही दिवसांपूर्वी लाँच झालेला Xiaomi कंपनीचा Poco F1 हा फोन अवघ्या ५,७९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. सध्या या फओनची किंमत २१,९९९ असून त्यावर भरघोस सूट मिळणार आहे.

आता इतकी सूट कशी असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या या फोनवर सेलमध्ये १ हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. दुसरा एखादा फोन देऊन हा फोन घेत असाल तर ५०० रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. एचडीएफसीच्या क्रेडिट कार्डचा वापर करुन खरेदी करणार असाल तर २५०० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच या फोनवर आणखी डिस्काऊंट हवी असेल तर तुम्हाला १४९ रुपयांची बायबॅक पॉलिसी खरेदी करावी लागेल. यामध्ये तुम्ही ८ महिन्यांच्या आत हा खरेदी केलेला फोन विकला तर तुम्हाला १४,७०० रुपये परत मिळणार आहेत. त्यामुळे साहजिकच या फोनची किंमत खूपच कमी होते.

याबरोबरच Xiaomi Mi Max 2 या फोनवर ७ हजारांचे डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे २९,९९९ रुपयांचा हा फोन २२,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. या फोनची रॅम ६ जीबी असून त्याला १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. Redmi Note 5 pro bj 2 हजारांचे डिस्काऊंट मिळेल. त्यामुळे हा फोन १२,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. Redmi 6 हा फोन १ हजार रुपयांच्या डिस्काऊंटनंतर ७,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. Vivo V9 Youth हा फोन ६ हजारांच्या डिस्काऊंटनंतर १३,९९० रुपयांना खरेदी करता येईल. हे सर्व फोन एचडीएफसीचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरुन खरेदी केल्यास त्यावर अतिरिक्त १० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. याबरोबरच Realme 2 Pro या फोनवरही आकर्षक डिस्काऊंट देण्यात आला आहे. हा फोन कर्ज काढून घेतल्यास त्याचा हाफ्ता बराच कमी बसतो.