फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज २५ जुलैपासून; आयफोन १२, पोको एक्स ३ प्रो मोबाइलवर मोठी सूट!

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल २५ जुलैपासून ते २९ जुलैपर्यन्त असणार आहे.

Flipkart Big Saving Days
सेलमध्ये आताच नव्याने लॉंच स्मार्टफोनवरतीही सवलत असणार आहे.

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजची अनेक जण वाट बघत असतात. अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल सुद्धा जुलै २६ पासून सुरु होत आहे. दोन्ही सेलमध्ये अनेक प्रोडक्टसवर घसघशीत सूट देण्यात आली आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज मध्ये  काही प्रमुख स्मार्टफोन ब्रँडवर मोठी सवलत आणि ऑफर देण्यात येणार आहेत. फ्लिपकार्टच्या प्लस सदस्यांसाठी हा सेल १ दिवस लवकर सुरू होईल. फ्लिपकार्टने अद्याप सगळ्याच सवलती आणि ऑफर जाहीर केल्या नाहीत. फक्त काही टॉप ऑफर्स रीवील केल्या आहेत. आयसीआयसीआय बँक ग्राहक अतिरिक्त १०% इन्स्टंट सूट घेऊ शकतात.

बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये ‘या’ स्मार्टफोनवर आहे ऑफर्स

पोको एक्स३ प्लस ज्याची किंमत सध्या रु.२३,९९९ आहे ती सेल दरम्यान १७,२४९ रुपये (आयसीआयसीआय बँक ऑफरसह). पोको एक्स ३ प्लसमध्ये  ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. तर ६.६७ इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. ४८ मेगापिक्सलचा प्राथमिक सेटअप आहे.

आयफोन १२ ची किंमत सध्या ७७,९०० आहे. याची किंमत सेल दरम्यान कमी होईल. तथापि, फ्लिपकार्टने अद्याप नेमकी सवलत रक्कम जाहीर केली नाही. येत्या काही दिवसात सवलतीच्या किंमती जाहीर होणे अपेक्षित आहे. आयफोन १२ हा ६.१ इंच सुपर रेटिना डिस्प्लेसह येतो. हा स्मार्टफोन आयपी वॉटर आणि डस्ट-रेझिस्टंट आहे. सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या अन्य स्मार्टफोनमध्ये सॅमसंग एफ ६२ चा समावेश आहे ज्यामध्ये  ७०००  एमएएच बॅटरी दिली गेली आहे. सॅमसंग एफ ६२ सध्या २९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

शाओमीच्या एमआय ११ लाइटची किंमत सध्या रु. २३,९९९ आहे. ऑफरमध्ये हा फोन २०,४९९ रुपयांना उपलब्ध होईल.यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल सटोरेज आहे. तर ६४ -मेगापिक्सलचा प्राथमिक मागील कॅमेरा देखील आहे.

नवीन फोनवरतीही सूट

नव्या लॉंच स्मार्टफोनपैकी इंफिनिक्स नोट १०  प्रो १६,९९९ रुपयामध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६  जीबी इंटर्नल मेमरी स्टोरेज आहे. हे मीडियाटेक हेलिओ जी ९५  प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि यात ५००० एमएएच बॅटरी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Flipkart big saving days sale deals on iphone 12 poco x3 pro and other mobile offers ttg