5000mAh बॅटरी आणि चार कॅमेऱ्यांचा सेटअप, सेलमध्ये फक्त 6,999 रुपयांत खरेदी करा ‘बजेट’ स्मार्टफोन

भरघोस डिस्काउंटसह जबरदस्त बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर Big Saving Days सेलला सुरूवात झाली आहे. 18 डिसेंबरपासून सुरू झालेला हा सेल 22 डिसेंबर अर्थात उद्यापर्यंत असेल. या सेलमध्ये पोको, रिअलमी, सॅमसंग यांसारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सचे स्मार्टफोन डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. शिवाय अनेक आकर्षक ऑफर्सचाही ग्राहकांना लाभ मिळू शकतो. पोको कंपनीचा जबरदस्त बजेट स्मार्टफोन C3 या फोनवरही सेलमध्ये शानदार डिस्काउंट मिळत आहे.

पोको कंपनीने ट्विटररुन डिस्काउंटबाबत माहिती दिली आहे. पोकोने केलेल्या ट्विटनुसार, पोको C3 स्मार्टफोन (3GB+32GB) 9,999 रुपयांऐवजी केवळ 6,999 रुपयांमध्ये आणि 4GB+64GB व्हेरिअंट 10,999 रुपयांऐवजी अवघ्या 7,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. कंपनीने ट्विटमध्ये या फोनच्या दोन वैशिष्ट्यांचाही उल्लेख केला आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. जाणून घेऊया फोनचे स्पेसिफिकेशन्स…

आणखी वाचा- ट्रिपल कॅमेरा, मोठा डिस्प्ले; ‘ओप्पो’चा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Oppo A15s चा आज पहिला सेल

या फोनमध्ये 6.53 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 4जीबीपर्यंत रॅम आणि 64 जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज आहे. मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर असलेल्या या फोनची मेमरी माइक्रो एसडी कार्डद्वारे 512जीबीपर्यंत वाढवताही येऊ शकते. याशिवाय पोको C3 मध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी असून फोनच्या मागील बाजूला तीन कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यात 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, एक 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा आणि एक 2 मेगापिक्सेलचा डेप्थ कॅमेरा आहे. हा फोन MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असलेल्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही मिळेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Flipkart big saving days the craziest deal of 2020 on budget smartphone poco c3 only at 6999 rupees sas