scorecardresearch

Floor Cleaning Tips: घरातील फरशी अशा प्रकारे करा स्वच्छ, लवकर निघून जाईल पिवळसरपणा

नियमित स्वच्छता न झाल्यास फरशीचा रंग बदलतो. तसेच अनेक जीवजंतु राहिल्याने घरात आजारपणे येण्याची शक्‍यता असते. घरातील फरशी स्वच्छ आणि चकचकीत रहावी यासाठी काही उपाय करता येतात.

फरशी अॅसिडने साफ करू नका अन्यथा फरशी खराब होऊ शकते. (photo credit: file photo)

फक्त घर छान दिसावे म्हणून नव्हे तर आजारपण येऊ नयेत म्हणूनही फरशी स्वच्छ असणे आवश्‍यक आहे. नियमित स्वच्छता न झाल्यास फरशीचा रंग बदलतो. तसेच अनेक जीवजंतु राहिल्याने घरात आजारपणे येण्याची शक्‍यता असते. घरातील फरशी स्वच्छ आणि चकचकीत रहावी यासाठी काही उपाय करता येतात. तर अनेकदा घरातील पिवळ्या फरशीमुळे लोकं खूप त्रासलेले असतात. या समस्येवर मात करण्यासाठी ते कोणत्या पद्धतींचा अवलंब करतात हेच कळत नाही. अशा परिस्थितीत काही टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. याच्या मदतीने घरातील फरशी स्वच्छ होताच चमकदार देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत त्या पद्धती काय आहेत आणि आपण त्या कशा वापरू शकता हे जाणून घ्या.

– घरातील फरशी चमकदार व साफ करण्यासाठी एक बादली पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्या पाण्याने संपूर्ण फरशी स्वच्छ करा. असे केल्याने केवळ फरशी चमकदार होत नाही तर पिवळसरपणाही दूर करता येतो.

– फरशी चमकदार करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा देखील वापरू शकता. अशा परिस्थितीत एक मग पाण्यात बेकिंग सोडा पावडर मिसळा आणि त्यात सुती कापड भिजवून फरशी पुसल्याने फरशी लवकर साफ करता येते. तसेच खुणा देखील लगेच काढता येतात.

– तुम्हाला फरशी स्वच्छ आणि पांढरी शुभ्र ठेवायची असेल तर एक कप पाण्यात रॉकेल मिसळा आणि सूती कापड भिजवून फरशी वर पडलेले ठसे साफ करा. साफ केल्यानंतर, कोमट पाण्याने पुन्हा फरशी पुसून घ्या. असे केल्याने फरशी साफ होतेच व चमकदार दिसते.

या गोष्टींची विशेष काळजी घ्या

फरशी अॅसिडने साफ करू नका अन्यथा फरशी खराब होऊ शकते.

जेव्हा तुम्ही फरशी साफ करता तेव्हा रबरचे हातमोजे घाला.

फरशी पुसताना जाड कापडाने पुसून जावे. हलके कापड लवकर फाटू शकते आणि त्याने फरशी देखील चांगली साफ होत नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Floor cleaning easy tips how to remove yellow patches for brightness scsm