Vata Pitta and Kapha balanced in the body: आजकालच्या धावपळीच्या जीवनात निरोगी शरीर राखणे हे एक मोठे आव्हान आहे. व्यायाम आणि सकस आहारासाठी वेळ काढणे अनेकदा कठीण होऊन जाते. आपण दररोज अशा अनेक गोष्टी नकळत करतो, ज्यामुळे आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ हे त्रिदोष असंतुलित होतात. परंतु, दररोज लहान आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब करून तुम्ही तुमचे शरीर स्वास्थ्यकर राखून अनेक आजार टाळू शकता.

‘या’ उपायांनी वात, पित्त,कफ राहील संतुलित

१. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करा

आयुर्वेदानुसार सकाळी उठल्याबरोबर तुम्ही काय खाता किंवा पिता, यावर तुमचा दिवसभराचा मूड अवलंबून असतो. योग्य सुरुवात केल्याने पचनक्रिया व्यवस्थित चालते, चयापचय सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. तथापि, एकच गोष्ट प्रत्येकासाठी सारख्याच पद्धतीने लागू पडेल, असे नाही. कारण- प्रत्येकाची शरीररचना वेगवेगळी असते. त्यानुसार वात, पित्त व कफ या तीन दोषांचा प्रत्येकावर परिणाम होत असतो.

वात दोष – सकाळी एक चमचा गाईचे तूप घ्या. त्यानंतर आल्यासोबत एक ग्लास कोमट पाणी प्या. त्यामुळे वात दोष संतुलित राहील.

पित्त दोष – आपल्या दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी एक ग्लासभर थंड शहाळ्याचे पाणी किंवा सुमारे २५ मिली कोरफडीचा शुद्ध शुद्ध पिऊन करा. त्यामुळे पित्ताचे संतुलन राखण्यास मदत होईल.

कफ दोष – लिंबू, आले व मध यांचे संमिश्रण केलेले एक कप कोमट पाणी प्या‌. त्यामुळे तुमची चयापचय क्रिया सुधारेल आणि पचनसंस्था संतुलित राहील.

२. प्राणायाम करा

प्राणायाम हे एक प्राचीन श्वासोच्छ्वास तंत्र आहे. हे सोपे आणि प्रभावी असून, ऑक्सिजन आणि प्राणाचा प्रवाह सुधारण्यास मदत करते. शरीरातील ऊर्जेचा प्रवाह सुधारल्यामुळे फुप्फुसे, हृदय आणि इतर अवयवांचे कार्य सुधारते. प्राणायामाच्या नियमित सरावाने तणाव, चिंता व नैराश्य कमी होते, एकाग्रता वाढते आणि शरीर शिथिल होते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, चयापचय क्रिया सुधारते आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

३. फोडणी दिलेले पदार्थ खा

भाज्यांमधील जिरे असो किंवा डाळींमधील हळद, लसूण किंवा आले असो; मसाले पचनक्रिया सुधारतात, चयापचय क्रिया मसाले पचनक्रिया सुधारून, तुमच्या जेवणाची चव वाढवतात. डाळींमध्ये तूप घातल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणे टाळण्यास मदत होऊ शकते. भारताचा लोकप्रिय तडका पचनक्रिया, चयापचय क्रिया, सांधे आणि त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

४. औषधी वनस्पतींच्या साह्याने तणाव कमी करा

तणाव अनेक समस्यांचे मूळ कारण आहे. अश्वगंधा, ब्राह्मी, शंख, लेमनग्रास व तुळस यांसारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती शांत आणि सुखदायक असतात. त्या तणाव, नैराश्य व चिंता कमी करून आरोग्य सुधारण्यास मदत करतात. या औषधी वनस्पती निद्रानाशापासून आराम देतात आणि स्मरणशक्ती वाढवतात.

५. चांगली झोप घ्या

झोप तुमच्या शरीराची दुरुस्ती करते. चांगल्या झोपेमुळे चयापचय म्हणजेच पचनक्रिया सुधारते. साहजिकच त्यामुळे तुमचे शरीरस्वास्थ्य सुधारण्यास मदत होऊन, तुमच्या आरोग्यदायी आयुष्यमानात वाढ होते. पुरेशी झोप घेतल्याने अनेक आजार टाळता येतात, वजनवाढ रोखता येते, तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि दीर्घकालीन आजार टाळणे शक्य होते.आयुर्वेदानुसार, चांगली झोप उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहे. म्हणून दररोज किमान ७-८ तास झोप घेण्याचे ध्येय ठेवा.

आयुर्वेद शरीर आणि मन या दोन्हींच्या आरोग्याला प्रोत्साहन देतो. या सोप्या दैनंदिन उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचे आरोग्य संतुलित ठेवू शकता.