बहुतेक स्त्रिया जेव्हा कोणत्याही कार्यक्रमात किंवा पार्टीला जातात तेव्हा त्यांची इच्छा असते की कार्यक्रमाच्या आधीच मासिक पाळीपासून मुक्त व्हावे. कधी कधी अचानक कुठल्यातरी धार्मिक उत्सवात सहभागी व्हावे लागते, तेव्हाही हे टेन्शन येणं स्वाभाविक आहे. कारण या काळात पोटदुखी किंवा इतर समस्यांशी झुंजणाऱ्या अनेक महिला अस्वस्थ राहतात. मासिक पाळीमुळे कार्यक्रमाचा पूर्ण आनंद सुदधा घेता येत नाही. त्यामुळे तिचे मन उदास राहते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधी कधी संपूर्ण कुटुंबाला बाहेरची टूर मिळत असते आणि तुम्हाला इच्छा असूनही त्याचा आनंद घेता येत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक मुलगी किंवा स्त्री विचार करते की मला या कालावधीपासून लवकर सुटका मिळाली असती तर आपल्यालाही बाहेर फिरण्याचा आनंद घेता आला असता.
तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक चांगली बातमी आहे. होय! हे शक्य आहे, असे अनेक नैसर्गिक उपाय आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमची मासिक पाळी लवकर आणू शकता आणि ते सुरक्षितही आहे. तर जाणून घ्या काही घरगुती उपाय ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

( नक्की वाचा: मासिक पाळीची तारीख पुढे ढकलायचीय?; ‘या’ नैसर्गिक उपायांचा करा अवलंब, नक्कीच मिळेल फायदा)

ओवा आहे फायदेशीर

ओवा आणि गुळाचे मिश्रण मासिक पाळी लवकर येण्यासाठी असरदार उपाय आहे. यासाठी १ चमचा ओवा घ्या आणि १ चमचा गूळ घ्या. त्यानंतर एक पातेल्यात १ ग्लास पाणी घ्या आणि त्यात ओवा आणि गुळ घाला. हे दोन्ही चांगले पाण्यात उकळू द्या. त्यानंतर हे तयार झालेले पाणी रिकाम्या पोटी प्या. असं मासिक पाळीची तारीख असेल त्याच्या आधी ७ ते ८ दिवस असं केल्यास, तुम्हाला नक्की फायदा मिळेल.

पाहा व्हिडीओ –

उपाशीपोटी आलं खा

आल्याची चहा सगळ्यात असरदार उपाय आहे ज्यामुळे पाळी लवकर येऊ शकते. असं मानण्यात आलंय की, आलं गर्भाशय जवळील गरमी वाढवत. ज्यामुळे मासिक पाळी तारखेपेक्षा लवकर येते. तुम्ही आल्याचा उपयोग चहा बनवून पिऊ शकता किंवा आल्याच्या रसामध्ये काही मधाचे थेंब टाकून सुद्धा घेऊ शकता. तुम्ही दररोज रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास तुम्हाला नक्की फायदा मिळेल.

(नक्की वाचा: वयाच्या ३० वर्षांनंतर प्रत्येक महिलेने ‘या’ ५ चाचण्या करायला हव्यात; जाणून घ्या माहिती)

पपई आहे फायदेशीर

कच्ची पपई मासिक पाळी लवकर येण्यासाठी फायदेशीर आहे. पपईमध्ये असलेले कॅरोटीन एस्ट्रोजन हार्मोन गर्भाशयाला उत्तेजित करतात. ज्यामुळे मासिक पाळी लवकर येण्याची संभावना जास्त असते. यासाठी कच्ची पपई दिवसातून २ वेळा खाणे गरजेचे आहे. ज्यामुळे त्याचा लवकर फायदा होतो आणि तुमची पाळी देखील लवकर येते.

बडीशेपाचे फायदे

जर तुम्ही बडीशेपाचे नियमित सेवन केल्यास, तुमची मासिक पाळी नियमित होते. तसंच तुम्ही पाळी देखील लवकर येते. यासाठी एक ग्लास पाण्यात २ चमचे बडीशेप घालून रात्रभर सोडून द्या. त्यानंतर सकाळी हे पाणी गाळून प्यायल्यास तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. हा उपाय तुम्ही मासिक पाळी येण्याच्या आठ दिवस आधी करू शकता ज्याने तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळेल.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Follow these home remedies for early menstruation will definitely benefit gps
First published on: 25-07-2022 at 16:18 IST