Cooking Tips: जेव्हा आपण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतो तेव्हा डाएट प्लॅन, वर्कआउट चार्ट यासारख्या अनेक गोष्टी आपण आपल्या शेड्यूलचा भाग बनवतो. लोकांकडे वजन कमी करण्यासाठी बरीच माहिती असते, त्याचा ते अवलंब देखील करतात. मात्र, बहुतेक लोकांना हे माहित नसते की तुम्ही ज्या पद्धतीने स्वयंपाक करता, तर ती पद्धत देखील वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जर अन्न योग्य प्रकारे शिजवले तर पोषक तत्वे टिकून राहतात आणि वजन कमी करण्यास मदत होते. आम्ही तुम्हाला असेच काही मार्ग सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही हेल्दी फूड बनवू शकता, ज्यामुळे तुमचे वजनही नियंत्रणात राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाज्यांचे मोठे तुकडे करावेत

स्वयंपाक करताना नेहमी भाज्यांचे मोठे तुकडे करा कारण ते कमी तेल शोषून घेतात. जर तुम्हाला कमी चरबीयुक्त खायचे असेल तर भाज्या शिजवण्यापूर्वी तेलाने हलके कोट करा, यामुळे अन्न चवदार आणि निरोगी होईल. मोठे तुकडे भाज्यांचा ओलावा आणि नैसर्गिक रंग टिकवून ठेवतील. तसंच कमी तेल जेवणात वापरल्याने तुमचे वजन देखील नियंत्रणात राहील. तसंच भाजीला जास्तीत जास्त पोषक द्रव्ये मिळण्यासाठी भाजीची साल काढू नका, त्याची साल ठेवा. सालीमध्ये असलेले फायबर पोट भरलेले ठेवते आणि वारंवार नाश्ता करण्याची इच्छा टाळते. सफरचंद, बटाटे, काकडी, वांगी आणि टोमॅटो यांसारखी फळे आणि भाज्या सोलू नका.

( हे ही वाचा: वजन कमी करण्यासाठी हिरवा मूग आहे फायदेशीर; मूग भिजवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या)

मसाले

काळी मिरी आणि वेलची यांसारख्या ताज्या मसाल्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आरोग्य फायदे असतात. जे वजन वाढण्यास प्रतिबंध करतात. हे मसाले अतिरिक्त कॅलरीज किंवा सोडियम न जोडता जेवणाची चव वाढवतात. तसंच ताजा पुदिना, तुळस, कढीपत्ता यांसारख्या गोष्टी आरोग्यदायी असतात. या गोष्टी जेवणात घातल्याने जेवणाची चवही वाढते.
त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असणारे मसाले जेवणात जोडल्याने, जेवणाचीही चव वाढते आणि याने तुमचे वजन देखील नियंत्रणात राहते.

भाजीपाला मायक्रोवेव्ह करा

मायक्रोवेव्हिंग भाज्यांमध्ये पोषक तत्व टिकवून ठेवण्याचे फायदे आहेत. तसंच त्यामध्ये वेळ देखील कमी लागतो आणि वाचतो. मायक्रोवेव्हमध्ये भाज्या वाफवणे हे उत्तम तंत्र आहे. एका अभ्यासानुसार, मायक्रोवेव्ह मध्ये वाफवलेली ब्रोकोली ही बाहेर उकळण्यापेक्षा जास्त व्हिटॅमिननी भरपूर तसंच सुरक्षित असते.

( हे ही वाचा: वडाच्या सालाचा काढा आरोग्यासाठी आहे खूप फायदेशीर; जाणून घ्या कसा बनवायचा)

ऑलिव्ह ऑईल वापरणे

ऑलिव्ह ऑइलमध्ये भाज्या भाजणे हा त्यांना शिजवण्याचा एक चांगला मार्ग आहे.ऑलिव्ह ऑइल भाज्या भाजण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे कारण या तेलात अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सचे प्रमाण सर्वाधिक असते. ऑलिव्ह ऑईलचा कमीत कमी वापर करूनही जेवणाला चव येते. तसंच या तेलामुळे वजनावर देखील परिणाम होत नाही.

भाजलेल्या भाज्या खा

भाजलेल्या भाज्यांमध्ये पोषक तत्व जपले जातात. गाजर, सिमला मिरची, झुचीनी, कांदा, मटार आणि काही टोफू चौकोनी तुकडे धुवून कापून घ्या. आता कढईत अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल गरम करून त्यात भाज्या आणि टोफू घालून तळून घ्या. ५ मिनिटे त्यावर झाकण ठेवा, आता आणखी काही वेळ ढवळा. त्यानंतर त्यात चिमूटभर मीठ, ताजी काळी मिरी, ओरेगॅनो आणि काही तुळशीची पाने घाला. अशाने तुमचे निरोगी आणि सुरक्षित अन्न खाण्यासाठी तयार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Follow these methods of cooking to lose weight get amazing benefits gps
First published on: 05-07-2022 at 11:07 IST