जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार जगभरात हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या इतर कारणांपेक्षा जास्त आहे. तणाव, बदललेली जीवनशैली, पुरेसा व्यायाम न करणे यांमुळे अनेकजण हृदयविकाराला बळी पडत आहेत. अशात हृदयाची काळजी नेमकी कशी घ्यायची हा प्रश्न आपल्याला पडतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप, तज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम या गोष्टींचा सल्ला नेहमी दिला जातो. याबरोबर आणखी कोणत्या गोष्टी हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वजन कमी करा
जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डीओलॉजि यामध्ये नमुद केल्याप्रमाणे लठ्ठपणामुळे ‘कोरोनरी आर्टरी’ (हृदयाशी संबंधित आजार) हा आजार होऊ शकतो. वजन जास्त असणाऱ्यांना हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी वजन नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा.

Weight Loss : ‘या’ सवयी वजन कमी करण्यात ठरतात अडथळा; लगेच करा बदल

योगासने
काही योगासने हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. ‘द जर्नल ऑफ एवीडन्स बेसड कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटीव्ह मेडिसिन ‘ यामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासामध्ये योगासने केल्याने हृदय निरोगी राहण्यास कशी मदत मिळते हे नमुद करण्यात आले आहे. जर एखाद्या व्यक्तीला कठीण व्यायाम न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असेल, तर अशा व्यक्ती योगासने ट्राय करू शकतात.

योग्य खाद्यपदार्थ
हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि पुरेपूर आहार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तेलकट, फॅट असणारे पदार्थ असे पदार्थ खाणे टाळा. जास्तीत जास्त फळं, भाज्या, कमी प्रोटीन असलेले पदार्थ अशा पदार्थांचा आहारात समावेश करा. यासह अक्रोड, बदाम, सॅलेड अशा पदार्थांचा देखील समावेश फायदेशीर ठरेल. तसेच जेवणामध्ये मिठाचे प्रमाण मर्यादित राहील याकडे विशेष लक्ष द्या.

Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांनी व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या जाणून घ्या

योग्य पेयं प्या
ग्रीन टी, ब्लॅक टी आणि कॉफी ही पेयं हृदयविकार टाळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पण ही पेय मर्यादित प्रमाणात पिणं गरजेच आहे. याशिवाय हिबिस्कस चहा, टोमॅटो, बेरी, बीटरूटचा रस ही पेय देखील तज्ञांच्या सल्ल्यानुसार पिऊ शकता. तसेच योग्यप्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Follow these things to keep your heart healthy pns
First published on: 05-10-2022 at 15:29 IST