करोनामुळे राज्यभरात लॉकडाउन लागू झाल्यानंतर सलून, स्पा आणि ब्युटी पार्लरसह अनेक व्यवसाय आणि दुकाने बंद झाली. त्यानंतर अनलॉक प्रक्रिया कित्येक राज्यात सुरु झाली असली तरीही संसर्ग होण्याच्या भीतीमुळे बरेचजण सलून, स्पा किंवा ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास अजूनही धास्तावतात. परंतु आपल्या त्वचेची काळजी आपल्याला घेण गरजेचं आहे. त्वचेची काळजी न घेतल्यास त्वचेचे आजारही होऊ शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यसाठी लॉकडाउन हे कारण ठरू देऊ नका. घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही काही टिप्स फॉलो करत त्वचेची काळजी घेऊ शकता.

खाली दिलेल्या टिप्स नियमित फॉलो केल्यास सुंदर त्वचा मिळवण्यासाठी मदत होऊ शकते.

१) झोप आणि योग्य वेळी खाणे ही आपली त्वचा ताजी आणि चमकदार ठेवण्याची पहिली आणि मूलभूत पायरी आहे. रात्रीची एक चांगली झोप आणि योग्य आहार आणि शारीरिक व्यायाम आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खूप मदत करते.

२) दररोज नित्यक्रमाने योग्य स्किनकेअर रुटीन केल्यास आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. त्वचा कोरडी होऊ नये म्हणून चेहरा धुतल्यानंतर दररोज मॉइश्चरायझर लावा. कोरड्या त्वचेत मुरुम होण्याची शक्यता नेहमीच असते. आपल्या त्वचेच्या प्रकारास अनुकूल असलेल्या फेस स्क्रबचा वापर मृत पेशी (डेड स्कीन) काढून टाकण्यास देखील मदत करू शकतो.

३) महिन्यातून एकदा जमल्यास फेशियल करावे. पार्लर जरी बंद असले तरी बरेच फेस पॅक ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्याचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता.

४) बाहेरच्या पदार्थांऐवजी ताजी फळे आणि भाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करा. दिवसभर पुरेसे पाणी प्यायला विसरू नका.

५) या सगळ्या गोष्टींसह उत्तम त्वचेसाठी चांगली मानसिक स्थिती असणे सुद्धा आवश्यक आहे. कामासोबतच आवर्जून विश्रांतीदेखील घ्या, ज्यामुळे मानसिक शांती मिळण्यास मदत होते.