प्रत्येक महिलांना आपण सुंदर दिसावं अस वाटत. त्यासाठी त्या वेगवेगळ्या पद्धतीने चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवण्याचे प्रयत्न करत असतात. यासाठी मेकअपचा देखील अवलंब केला जातो. चेहऱ्यावरील मेकअप करताना डोळ्यांचे सौंदर्य केवळ आयलायनर लावल्याने पूर्ण होते. डोळ्यांना आकर्षक बनवण्यासाठी महिला वेगवेगळ्या रंगांचे आयलायनरही लावतात. आयलायनरमुळे डोळे मोठे दिसतात. परंतु, अनेक तज्ञांचे मत आहे की डोळ्यांवर आयलायनर किंवा कोणत्याही प्रकारचा मेकअप लावून झोपू नये. पण ही चूक बहुतेक महिलांकडून होत असते. आयलायनर काढण्यासाठी बहुतेक स्त्रिया पाण्याने डोळे धुतात. पण, पाणी वापरूनही ते लवकर निघत नाही. चला तर मग जाणून घेऊया आयलायनर काढण्याच्या सोप्या टिप्स

गुलाब पाण्याचा वापर

त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी गुलाबपाणी उपयुक्त आहे. त्वचा तजेलदार बनवण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर केला जातो. गुलाबपाणीद्वारे तुम्ही सहजपणे आयलायनर काढू शकता. आयलायनर काढण्यासाठी तुम्ही २ कापसांच्या बोळ्यांवर पाणी घ्या आणि ते आयलायनरवर २ ते ३ मिनिटे लावा. यामुळे तुमचे आयलायनर सहज निघून जाईल.

नारळाचे तेल

त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर आपल्या पूर्वजांपासून केला जातो. खोबरेल तेलाने आपण आयलायनर देखील काढू शकतो. यासाठी टिश्यू पेपर घ्या आणि त्यावर खोबरेल तेलाचे दोन ते तीन थेंब टाकून डोळे स्वच्छ करा. याने तुमचं आयलायनर सहज निघून जाईल.

घरगुती मेकअप रिमूव्हरसह आयलायनर काढा

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरी मेकअप रिमूव्हर देखील बनवू शकता. घरगुती मेकअप रिमूव्हर बनवण्यासाठी तुम्ही एक चमचा कच्चे दूध घ्या त्यात बदामाचे तेल घाला. यानंतर, कापसाच्या बोळ्याच्या मदतीने ते डोळ्यांवर लावून स्वच्छ करा. याने आयलायनर निघून जाईल.