चहा हे आपल्या दैनंदिन जीवनात रोज वापरले जाणारे आवडते पेय आहे. चहाशिवाय लोकांच्या दिवसाची सुरवातच होत नाही. तर संध्याकाळी, थकवा दूर करण्यासाठी, अगदी पाहूण्यांचं स्वागत सुद्धा चहाच्या कपाने होतं. चहा आरोग्यासाठी चांगला आहेच आणि चहा प्यायल्यामुळे आपल्याला खुप फ्रेश वाटतं. पण या चहासाठी तुम्ही बाजारातून चहापत्ती विकत घेताना ती चांगल्या दर्जाचीच आहे का? याची खात्री करताय का? कारण इतर खाद्यपदार्थांप्रमाणेच भेसळयुक्त चहापत्ती बाजारात विकली जात आहे. या भेसळयुक्त चहापत्तीमध्ये हानिकारक रंग आणि अगदी लोहयुक्त पावडरचा वापर केला जातो. अशा चहापत्तीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने चहापत्ती खरी आहेत की भेसळयुक्त आहेत, हे तपासण्यासाठी एक सोपी पद्धत सांगितली आहे. या पद्धतीचा वापर करून चहापत्तीचा दर्जा योग्य आहे की नाही, हे आपण सहज शोधू शकतो.

how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स
Yoga for Back Paine
पाठदुखीची समस्या सोडत नाही पाठ? ‘या’ एका आसनाने मिळेल फायदा
how to make crunchy karela fry recipe
Recipe : अशा पद्धतीने कारल्याच्या काचऱ्या बनवाल तर, कडवटपणा झटक्यात विसरून जाल! ही रेसिपी पाहा…

यासाठी तुम्हाला खालील पद्धतीचा अवलंब करावा लागेल

  • एक फिल्टर पेपर घ्या आणि त्यावर चहापत्ती पसरवा.
  • आता फिल्टर पेपरवर पाण्याचे काही थेंब शिंपडा म्हणजे पेपर थोडा ओला होईल.
  • फिल्टर पेपरमधून चहापत्ती काढून फिल्टर पेपर प्रकाशात ठेवा आणि त्यावरचे डाग पहा.

चहापत्तीत भेसळ नसेल तर फिल्टर पेपरवर डाग किंवा खूण राहणार नाही. पण जर चहापत्तीत भेसळ झाली असेल तर फिल्टर पेपरवर काळे-तपकिरी डाग दिसतात.

त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या खाद्यतेलातील भेसळ तपासू शकता. FSSAI ने तेलातील भेसळ तपासण्याची पद्धत शेअर केली आहे. तेलातील भेसळ तपासण्यासाठी एका भांड्यात दोन मिलिलिटर खाद्यतेल घ्या आणि त्यात थोडेसे लोणी मिसळा. जर तेलात भेसळ असेल तर त्याचा रंग बदलेल आणि जर तुमचे खाद्यतेल शुद्ध असेल तर त्याचा रंग कोणत्याही प्रकारे बदलणार नाही.

त्याचप्रमाणे, हळदीमध्ये भेसळ ओळखण्यासाठी, तुम्ही एका ग्लास पाण्यात तीन-चतुर्थांश भाग घ्या. आता त्यात एक चमचा हळद घाला. जर हळदीत भेसळ असेल तर हळद लगेच काचेच्या तळाशी बसते आणि पाण्याचा रंग पिवळा होतो. दुसरीकडे, जर हळद शुद्ध असेल तर ती हळूहळू तळाशी जाईल आणि पाण्याचा रंग सोनेरी राहील.