भारतीय अन्न महामंडळामध्ये ४१०३ जागांची भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असणांऱ्यासाठी खूशखबर.

सरकारी नोकरीच्या शोधात असणांऱ्यासाठी खूशखबर. भारतीय अन्न महामंडळामध्ये विविध पदांसाठी ४१०३ जागांची भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२० पर्यंत आहे. एससी, एसटी आणि महिलांसाठी प्रवेश शुल्क शुन्य आहे. तर इतरांसाठी पाचशे रूपये परीक्षा फी आहे. नोकरीचं ठिकाण सर्व भारतात असून उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आणि उत्तर पूर्व अशा विभागामध्ये नोकरी करावी लागणार आहे.

वयोमर्यादा – दि. ०१ जानेवारी २०२० रोजी, वय १८ ते २८ वर्ष असावे. पदानुसार वयात विविधता. आधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

जाहिरात पाहण्यासाठी क्लीक करा

अर्ज करण्यासाठी क्लीक करा

कुठे आहेत जागा :

पद क्र.         पदाचे नाव                        विभाग    एकूण जागा
उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर पूर्व
    १ ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)    ४६ २६ २६ १४ ०२ ११४
    २ ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल    ३० १५ १० ०९ ०८ ७२
    ३ स्टेनो ग्रेड -II    ४३ ०७ ०९ ०९ ०८ ७६
   ४ एजी-II (हिंदी)    २२ १५ ०३ ०४ ०१ ४५
   ५ टायपिस्ट (हिंदी)    १६ ०३ १२ ०४ ०४ ३९
   ६ एजी-III (जनरल)    २५६ १५९ १०६ १२४ ११२ ७५७
   ७ एजी-III (अकाउंट्स)    २८७ ४८ ८७ ६५ २२ ५०९
   ८ एजी-III (टेक्निकल)    २८६ ५४ २२४ १५३ ०३ ७२०
   ९ एजी-III (डेपो)   १०१३ २१३ ६१ ३५३ १३१ १७७१
एकूण   १९९९  ५४० ५३८  ७३५ २९१ ४१०३

वरील नऊ पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे.  शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात पाहावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Food corporation of india recruitment nck

Next Story
स्वच्छ पाणी आणि साबणाने मुलांच्या चालनेत वाढ