शारदीय नवरात्री सुरू झालेली आहे. सर्वत्र चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रीमध्ये काही लोक पूर्ण नऊ दिवस उपवास ठेवतात. देवीची पूजा करणारे लोक उपवासाचे वेगवेगळे नियम पाळतात. अशावेळी उपवास करतानाच वजन ( Weight loss in Navratri ) कमी करायचे असेल तर आहाराची काळजी घ्यावी लागेल. आहारात तुम्ही पुढील पदार्थांचा समावेश केला तर तुमचे वजन कमी होऊ शकते, तसेच रोगप्रतिकार शक्ती देखील वाढू शकते.

१) नारळ पाणी

नारळ पाणीमध्ये कोलेस्ट्रोल, प्रथिने, कार्बोहायड्रेट, डायेटरी फायबर, फोलेट आणि जीवनसत्वे असतात. दिवसातून एक दोन वेळा नारळ पाणी पिता येऊ शकते. याने तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होईल.

(रशियातील वटवाघुळात आढळला ‘हा’ Covid सारखा विषाणू, त्यावर लसीचाही प्रभाव नाही)

२) भिजवलेले सुके मेवे

उपवास करताना तुम्ही भिजवलेले सुके मेवे खाऊ शकतात. सुके मेवे खालल्याने तुम्हाला अनेक पोषक तत्व मिळतील आणि अशक्तपणा दूर होईल. सुका मेवा रात्री भिजवून त्याचा आहारात समावेश करावा.

३) पपई

उपवासाच्या वेळी पोट साफ न होण्याची तक्रार असते. अशात पपई खा. पपईमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व क आढळते. याने पोट साफ होण्यास मदत होईल आणि उपवास सुटल्यावर फूड पॉइजनिंगचा धोका टळेल.

(या उपायांनी केळीसह ‘हे’ 5 पदार्थ अधिक काळ टिकू शकतात, जाणून घ्या)

४) दूध

दुधात प्रथिने, कॅल्शियम आणि रायबोफ्लेविन असतात. दूध पिल्याने भूक लागत नाही.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)