Foods To Lower Blood Pressure :आजकालची धावपळीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ‘हाय ब्लड प्रेशर’ (Hypertension) ही एक सामान्य समस्या बनली आहे. सायलेंट किलर मानल्या जाणाऱ्या या आजारावर नियंत्रण ठेवण्यात आपला आहार सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. संतुलित आहार घेऊन, मिठाचे सेवन नियंत्रित करून आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून बीपी सामान्य ठेवता येतो. केळी, बीट आणि डाळिंब यांसारखे काही पदार्थ बीपी सामान्य ठेवण्यासाठी प्रभावी मानले जातात. पण प्रश्न असा पडतो की, या रोजच्या खाद्यपदार्थांमध्ये अशी कोणती पोषक तत्त्वे असतात, जी हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात?
पीएसआरआय हॉस्पिटल (PSRI Hospital), नवी दिल्ली येथील डायटेटिक्स विभागाच्या प्रमुख डॉ. शालिनी गार्विन ब्लिस यांच्या मते, “हाय ब्लड प्रेशरची समस्या बऱ्याचदा कोणत्याही स्पष्ट लक्षणांशिवाय कायम राहते. जर यावर दीर्घकाळ नियंत्रण ठेवले नाही तर यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनीशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो. ज्या लोकांचा बीपी जास्त राहतो, त्यांना तो नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांची गरज भासते.
हाय बीपीच्या रुग्णांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी बीपी नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आहारातील काही गोष्टींचे सेवन केल्याने तुमचा बीपी सामान्य राहण्यास मदत होते. स्वयंपाकघरात असणारे डाळिंब, बीट आणि केळी ही अशी फळे आहेत, ज्यांचे सेवन करून तुम्ही बीपी सामान्य ठेवू शकता. हे फळे बीपी सामान्य ठेवण्यासाठी कशी उपयुक्त ठरू शकतात, हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
डाळिंब हे अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे (Pomegranate is a good source of antioxidants)
डाळिंबामध्ये पॉलीफेनॉल नावाचे प्लांट-बेस्ड घटक भरपूर प्रमाणात आढळतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीराच्या पेशींचे होणाऱ्या नुकसानापासून रक्षण करण्यास मदत करतात. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की डाळिंबाचे सेवन ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. डाळिंबांचे दाणे खाल्ल्याने अँटिऑक्सिडंट्ससोबतच डायटरी फायबरही मिळते. जर तुम्हाला डाळिंबाचा रस पिणे आवडत असेल, तर साखरेविना रस सेवन करा. डाळिंबाच्या रसाचे प्रमाणही मर्यादित ठेवावे, हे लक्षात ठेवा. हा रस अंदाजे १५० मिलिलिटरपर्यंतच प्यावा. डॉक्टरांनी सांगितले की, रसाच्या तुलनेत डाळिंबाचे दाणे खाणे अधिक उत्तम ठरते, कारण यामुळे फायबर मिळते आणि पोटही अधिक वेळ भरल्यासारखे वाटते.
बीटचे सेवन रक्त प्रवाह सुधारण्यासही मदत करते (Beetroot consumption also helps improve blood flow)
बीटमध्ये नायट्रेट आढळतात आणि शरीर या नायट्रेट्सचे नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर करते. हा एक असा घटक आहे, जो रक्तवाहिन्या शिथिल करण्यास (आराम देण्यास) आणि त्या रुंद करण्यास मदत करतो. यामुळे रक्ताचा प्रवाह सुधारू शकतो. बीटाच्या रसावर केलेल्या अनेक संशोधनाचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत.
वर्ष २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या सात रँडमाइज्ड कंट्रोल ट्रायलच्या सिस्टिमॅटिक रिव्ह्यू आणि मेटा-विश्लेषणामध्ये हाय ब्लड प्रेशर असलेल्या २१८ लोकांना समाविष्ट करण्यात आले होते. यामध्ये असे आढळून आले की, नायट्रेटने समृद्ध असलेल्या बीटाच्या रसाचे सेवन करणाऱ्यांचा सिस्टोलिक ब्लड प्रेशर (म्हणजेच हाय बीपी) हा या रसाचे सेवन न केलेल्या लोकांच्या तुलनेत सरासरी सुमारे ५ mmHg ने कमी झाला होता. तुम्ही बीट सॅलड, भाजी किंवा शिजवून तुमच्या आहात समाविष्ट करू शकता. एक लहान बीट, ज्याचे वजन सुमारे ७५-१०- ग्रॅम असावे, ते आरोग्यासाठी पुरेसे आहे. ज्या लोकांना मुतखड्याची (किडनी स्टोन) समस्या आहे, त्यांनी बीट खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा डाएटिशियनचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
केळी खा पोटॅशियमचा चांगला स्रोत (Eat bananas a good source of potassium)
केळीमध्ये पोटॅशियम आढळते. हे एक आवश्यक खनिज आहे, जे शरीरातील द्रवांचा समतोल राखण्यास आणि स्नायू व चेतासंस्थेचे (नर्व्हज) सामान्य कामकाज चालण्यास मदत करते. पोटॅशियम, जास्त सोडिअम (मिठाचे) सेवन केल्यामुळे ब्लड प्रेशरवर होणारे काही नकारात्मक परिणाम कमी करण्यातही भूमिका बजावतो. एका मध्यम आकाराच्या केळीमध्ये अंदाजे ४००-४५० मिलीग्राम पोटॅशियम असते. केळीचे रोज सेवन केल्याने शरीराला पुरेसे पोटॅशियम मिळते. यासोबतच हिरव्या भाज्या, डाळी आणि इतर फळे हे देखील पोटॅशियमचे चांगले स्रोत आहेत.
हे अन्नपदार्थही बीपी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात (These foods also help control BP)
ज्या लोकांचा बीपी हाय राहतो, त्यांनी आहारामध्ये पालक आणि तांदुळजा यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळतात. तसेच टोमॅटो, ब्रोकोली आणि डाळी देखील शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे आणि फायबर देतात. बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी निरनिराळी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि डाळी यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.
मीठ कमी करा आणि जीवनशैलीत करा हे बदल (Reduce salt and make these lifestyle changes)
हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ फळे आणि भाज्या खाणे पुरेसे नाही. यासोबतच दैनंदिन सवयींमध्ये काही बदल करणे देखील गरजेचे आहे.
मिठाचे जास्त सेवन टाळा. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, प्रौढांनी सर्व स्रोतांतून मिळून दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठाचे सेवन केले पाहिजे.
पॅकेज्ड उच्च रक्तदाबात (High Blood Pressure) डाळिंब, बीट आणि केळी किती फायदेशीर? डॉक्टरांनी सांगितले काय खावे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
टीप : हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी आपली औषधे बंद करू नयेत आणि आहारात मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. किडनीचा आजार किंवा शरीरात पोटॅशियम वाढण्याचा धोका असल्यास विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
