वजन कमी करण्यासाठी खास उपाय; ‘या’ चार प्रकारच्या चहाचे सेवन ठरणार फायदेशीर

जाणून घ्या अशा चहाबद्दल जे वजन झपाट्याने कमी करण्यात प्रभावी आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

वजन वाढणे ही सध्याच्या काळातली सर्वात मोठी समस्या आहे. वजन नियंत्रित करण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास व्यायाम करतात आणि आहारावरही नियंत्रण ठेवतात, तरीही वजन कमी होत नाही. वाढता करोना आणि निर्बंधांमुळे अनेक जण घरातून काम करत आहेत. त्यामुळे एकाच जागी बसून राहण्याचं प्रमाण वाढलंय. शरीराच्या हालचाली कमी झाल्याने लोकांना वाढत्या वजनाचा त्रास जाणवू लागला आहे. करोनामुळे एकाच जागी बसून राहणं हे, लठ्ठपणाचे आणि वाढत्या वजनाचे सर्वात मोठे कारण आहे.

लठ्ठपणा आटोक्यात आणण्यासाठी केवळ व्यायाम आणि आहारच प्रभावी नाही तर काही खास घरगुती उपाय देखील वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. वजन कमी करायचे असेल तर आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करा. आयुर्वेदिक औषधी वनस्पती वजन लवकर कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. हर्बल चहाचे सेवन वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. औषधी वनस्पतींपासून तयार केलेला चहा लठ्ठपणावर नियंत्रण ठेवतो, तसेच पोटाची चरबी कमी करण्यात मदत करतो. चला जाणून घेऊया अशा चहाबद्दल जे वजन झपाट्याने कमी करण्यात प्रभावी आहेत.

ग्रीन टी वजन नियंत्रित करण्यास उपयुक्त:

लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी ग्रीन टी खूप प्रभावी आहे. या चहामुळे रक्त प्रवाह वाढतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे मेटाबॉलिज्म वाढते आणि वजन नियंत्रणात राहते.

ब्लॅक टी (काळा चहा):

जर तुम्हाला पोटाच्या चरबीमुळे त्रस्त असाल तर काळ्या चहाचे सेवन करा. पोषक आणि अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असलेला काळा चहा वजन कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. काळ्या चहाचे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्लॅक टी खूप गुणकारी आहे. याच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो.

लेमन टी:

वजन कमी करण्यासाठी लेमन टी प्रभावी आहे. जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर लेमन टी घ्या. आले आणि लिंबू तुमचे वजन लवकर नियंत्रणात ठेवतील. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त असलेला चहा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो, तसेच वजन नियंत्रित करतो. हा चहा तुम्ही दिवसातून दोनदा घेऊ शकता.

उलौंग टी:

तुम्ही उलौंग टी (Oolong Tea) बद्दल कधी ऐकले आहे का? आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेला हा चहा वजन कमी करण्यातही गुणकारी आहे. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की हा चहा चरबी कमी करण्यात खूप प्रभावी आहे. जर तुमची शुगर लेव्हल जास्त असेल तर या चहाचे नक्की सेवन करा. हा चहा कॅटेचिन आणि कॅफिनपासून बनवला जातो, जो वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Four type of teas to reduce weight black tea lemon tea hrc

Next Story
तुमचा CIBIL Score फ्रीमध्ये ऑनलाइन चेक करा; जाणून घ्या प्रक्रिया
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी