सध्या सर्वत्र क्रिकेट विश्वचषकाचा रंग चढताना पहायला मिळतोय, आणि याचाच फायदा उचलत टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. क्रिकेट विश्वचषकाच्या सर्व सामन्यांचं प्रसारण आपल्या ग्राहकांना लाइव्ह पहाता यावं यासाठी जिओने हॉटस्टारशी भागीदारी केली आहे. याअंतर्गत जिओच्या सर्व ग्राहकांना क्रिकेट विश्वचषकाचे सर्व सामने स्मार्टफोनवर पहाता येणार आहेत. विशेष म्हणजे जिओकडून ही सेवा पूर्णतः मोफत पुरवण्यात येणार आहे.

रिलायंस जिओच्या जवळपास 23 कोटी ग्राहकांना क्रिकेट विश्वचषकातील सर्व सामने आता अगदी मोफत आणि लाइव्ह पहाता येणार आहेत. यासाठी हॉटस्टार अॅप डाउनलोड करावं लागेल. कारण, जिओ टीव्ही अॅपवर सामने पहाण्यासाठी तुम्हाला आपोआप तुम्हाला हॉटस्टार अॅपवर पोहोचवलं जातं. याशिवाय जिओने जिओ क्रिकेट प्ले अलाँग हा गेम आणला आहे. सामन्यादरम्यान युजर्सचं मनोरंजन व्हावं यासाठी हा गेम जिओने आणला असून यामध्ये क्रिकेटसंबंधित काही प्रश्न विचारले जातात. तसंच जिओकडून 251 रुपयांच्या प्लॅनची घोषणा करण्यात आली असून यामध्ये 51 दिवसांसाठी एकूण 102 जीबी इंटरनेट डेटा वापरण्यास मिळतो. संपूर्ण विश्वचषकाचे सामने पहाण्यासाठी इतका डेटा पुरेसा राहिल असा कंपनीचा दावा आहे.