फ्रेंच फ्राइज आरोग्यासाठी धोकादायक

आधुनिक जीवनशैलीमुळे खमंग आणि चटकदार पदार्थ खाण्याचा मोह प्रत्येकाला पडतो.

फ्रेंच फ्राइज

आधुनिक जीवनशैलीमुळे खमंग आणि चटकदार पदार्थ खाण्याचा मोह प्रत्येकाला पडतो. मात्र तळलेले पदार्थ आणि त्यातही फ्रेंच फ्राइज हा पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक असतो, असे नुकत्याच एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. यासाठी संशोधकांनी बटाटय़ाच्या विविध प्रजातींचे संशोधन करून हा निष्र्कष काढला आहे.
फ्रेंच फ्राईजमध्ये आक्रायलामेड नावाच्या रासायनिक पदार्थाचे प्रमाण अधिक असते. हा रासायनिक पदार्थ शरीराला धोकादायक असतो. शरीरात वाढलेल्या अतिरिक्त आक्रायलामेडमुळे कर्करोग बळावण्याची भीती असते, असा दावा कर्करोगावर संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने केला आहे.
१२० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उष्णतेत तळलेल्या पदार्थामध्ये ‘आक्रायलामेड’चे प्रमाण अधिक असते. यात तळलेल्या बटाटय़ांचा वापर करून तयार केलेले फ्रेंच फ्राईज आणि बटाटय़ाचे चिप्स यांचाही समावेश आहे.
२०११मध्ये अमेरिकेच्या इदाहो विद्यापीठातील शास्त्रज्ञ याय व्ॉग यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या गटाने १४० बटाटय़ांच्या प्रजातींवर संशोधन करून ‘आक्रायलामेड’चे प्रमाण कमी असलेल्या बटाटय़ांची प्रजाती शोधून काढली होती. बटाटय़ांना उच्च तापमानावर शिजवले असता त्यात असणाऱ्या साखर आणि अ‍ॅमिनेया अ‍ॅसिडवर होणाऱ्या प्रक्रियेतून हवी असलेली चव आणि रंग प्राप्त होतो, पण ‘आक्रायलामेड’ची निर्मितीदेखील होते.
यासाठी संशोधकांनी अमेरिका आणि बाहेरील देशांमधून आणलेल्या बटाटय़ाच्या १४९ प्रजाती संशोधनासाठी प्रयोगशाळेत प्रक्रियेसाठी पाठवण्यात आल्या. या वेळी नोंदवण्यात आलेल्या निष्र्काषातून शास्त्रज्ञांनी तळलेल्या बटाटय़ामधून किती प्रमाणात ‘आक्रायलामेड’ निर्माण होते यांची नोंद ठेवली. यापैकी जाड तपकिरी रंगाची त्वचा असलेले आणि ईस्टन या बटाटय़ांच्या दोन प्रजाती वापरासाठी योग्य असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. तर भविष्यात अशाच प्रकारच्या प्रजाती शोधण्याचा संशोधकांचा कल आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: French fries is harmful for health