आपल्यापैकी बहुतांश लोक पोटदुखी, गॅस किंवा जळजळ यांना दैनंदिन समस्या समजून दुर्लक्ष करतात. कधी घरगुती उपाय करतात, तर कधी डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे देतात. मात्र वारंवार होणार्या पोटाच्या तक्रारींमागे एखादे गंभीर कारणही असू शकते, याचा आपण कधी विचार केला आहे का?
आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (IARC) च्या 2025 मधील अहवालानुसार, पोटाच्या तक्रारींची कारणे वेळेत ओळखली गेली, तर गॅस्ट्रिक कॅन्सर आणि गंभीर पचनसंस्थेच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबाद येथील वरिष्ठ गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. के. एस. सोमशेखर राव सांगतात की”पोटदुखी, गॅस आणि जळजळ यामागे अनेक वैद्यकीय कारणे असू शकतात. ही कारणे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग डॉक्टरांकडून जाणून घेऊया पोटदुखी, जळजळ आणि गॅस होण्यामागची कारणे व त्यावरचे उपाय.”
अपचन आणि संसर्ग (Indigestion and infection)
पोटाच्या तक्रारींमध्ये अपचन (Indigestion) हे सर्वात सामान्य कारण आहे. अधिक मसालेदार, तिखट, तळलेले आणि तेलकट पदार्थ, जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन किंवा गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्ल्यामुळे अपचन होते.
याशिवाय व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरायटिससारख्या संसर्गामुळे पोटात मुरड येणारी वेदना, जुलाब आणि अशक्तपणा जाणवू शकतो. ही लक्षणे काही दिवसांत कमी झाली, तर फारशी काळजी करण्याची गरज नसते. मात्र अशी समस्या वारंवार होत असेल, तर ती दुर्लक्षित करू नये.
पित्ताशयातील खडे आणि IBS (Gallstones and IBS)
पोटदुखी, जळजळ किंवा गॅस दीर्घकाळ टिकून राहात असेल, तर पित्ताशयातील खडे (Gallstones) हे त्यामागचे कारण असू शकते. या अवस्थेत पित्तनलिकेत अडथळा निर्माण होतो, त्यामुळे विशेषतः तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर तीव्र वेदना होतात.
तसेच इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) हा देखील पोटदुखी आणि गॅसचा मोठा कारणीभूत घटक आहे. या आजारात पोट फुगणे, अधूनमधून कळा येणे, कधी बद्धकोष्ठता तर कधी जुलाब असे त्रास होतात. IBSचा संबंध अनेकदा मानसिक ताणतणाव आणि चिंता यांच्याशी असतो.
अनियमित आहार आणि ताणतणाव (Irregular diet and stress)
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनियमित आहार, सततचा ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव सामान्य झाला आहे. डॉ. राव यांच्या मते, प्रोसेस्ड फूड आणि जंक फूडचे वाढते सेवन पोटाच्या आजारांना कारणीभूत ठरत आहे.
जलद गतीने जेवण करणे, नीट न चावता खाणे किंवा जास्त प्रमाणात कार्बोनेटेड ड्रिंक्स पिणे यामुळे गॅस आणि जळजळ अधिक वाढते. दीर्घकाळ तणावाखाली राहिल्यास पचनसंस्थेची कार्यक्षमता कमी होते.
GERD : छातीत जळजळ होण्याचे मुख्य कारण (GERD: The main cause of heartburn)
जर तुम्हाला वारंवार छातीत जळजळ, आंबट ढेकर किंवा घशात जळजळ जाणवत असेल, तर तो गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज (GERD) चा संकेत असू शकतो. या आजारात पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत जाते, ज्यामुळे जळजळ होते.
लठ्ठपणा, गर्भधारणा, हर्निया, धूम्रपान, मद्यपान तसेच चॉकलेट, टोमॅटो यांसारख्या पदार्थांचे अधिक सेवन GERD वाढवू शकते. योग्य वेळी उपचार न केल्यास भविष्यात कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो.
तपासणी का आवश्यक आहे?
डॉ. के. एस. सोमशेखर राव सांगतात की पोटदुखी, जळजळ आणि गॅस दीर्घकाळ राहिल्यास अल्ट्रासाऊंड, एंडोस्कोपी किंवा श्वसन चाचण्या करणे आवश्यक असते. कधी कधी ही लक्षणे अपेंडिसायटिस, पॅनक्रियाटायटिस किंवा अगदी कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे संकेत देत असतात.
वेळीच तपासणी केल्यास आजाराचे लवकर निदान होते आणि उपचार अधिक सोपे व प्रभावी ठरतात.
दिलासा देणारे उपाय आणि योग्य आहार
