Frequent Urination After Water: Normal or Concerning : पाणी प्यायल्यानंतर लघवी येणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे विशेषत: जेव्हा तुमच्या शरीरात पाण्याची पातळी कमी झालेली असते किंवा तुम्ही भरपूर मद्यपान केले असेल तर. तथापि, जर हे वारंवार होत असेल, अगदी कमी प्रमाणात पाणी प्यायल्यानंतरही, ते तपासणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
“पाणी प्यायल्यानंतर, मला दर १० ते १५ मिनिटांनी लघवी येते. माझ्या शरीरात काही समस्या आहे का?” असा प्रश्न Quora या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकाने विचारला. या प्रश्नाचे उत्तर ठाणे येथील KIMS हॉस्पिटल्सचे सल्लागार मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. आकिल खान यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “वारंवार लघवीची तीव्र इच्छा म्हणजे मूत्राशय किंवा मूत्रसंस्था असामान्यपणे प्रतिक्रिया देत आहे आणि त्याची तपासणी केली पाहिजे.”
सतत लघवी येण्याची कारणे (Causes of Frequent Urination)
- ओव्हरएक्टिव्ह ब्लॅडर (Overactive Bladder): मूत्राशयाचे स्नायू खूप पटकन आकुंचन होतात, पूर्ण भरले नसले तरीही ते तातडीने लघवी आल्याची भावना निर्माण करतात.
- यूटीआय (Urinary Tract Infection): लघवीसंबंधी संसर्गामुळे वारंवार लघवी येते.
- कॅफिन किंवा अल्कोहॉल (Caffeine or Alcohol): मूत्राशयात उत्तेजन निर्माण करतात.
- अनियंत्रित साखर (Poorly Controlled Blood Sugar): मधुमेहामुळे लघवी वाढते.
- तणाव किंवा चिंता (Stress or Anxiety): मूत्राशय संवेदनशील होतो, तातडी जाणवते.
- अत्यधिक द्रवसेवन (Excessive Fluid Intake): पटकन मोठ्या प्रमाणात पाणी प्यायल्यास मूत्राशय ओव्हरलोड होतो.
तज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात पाणी लवकर प्यायल्याने मूत्राशय जास्त प्रमाणात भरून जाऊ शकतो आणि वारंवार लघवी होऊ शकते.
डॉ. खान म्हणतात: “किडनींला द्रव पातळीचे संतुलन राखण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते, त्यामुळे लघवी वारंवार येते. दिवसभर पाणी हळूहळू प्यायल्यास हा त्रास कमी होतो.”
या लक्षणांचा विचार ‘रेड फ्लॅग’ म्हणून करा (When should this symptom be considered a red flag?)
लघवी करताना जळजळ किंवा वेदना, लघवीत रक्त, ओटी पोटाजवळ दुखणे, ताप, अचानक तातडी किंवा रात्री अनेक वेळा उठून लघवीला जाणे यासारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ही लक्षणे सूचित करतात की मूत्रसंस्थेत संसर्ग, दाह, पुरुषांमध्ये प्रोस्टेटची समस्या किंवा मधुमेहासारखे मेटाबॉलिक विकार असू शकतात.
वय आणि तणावाचा प्रभाव (Age & Stress Factors)
वय वाढल्यावर मूत्राशयाची क्षमता आणि नियंत्रण बदलते.
तणाव किंवा चिंता मूत्राशय संवेदनशील करतात, ज्यामुळे तातडीने लघवीला जाण्याची इच्छा अधिक जाणवते. जास्त लघवी न करताही जास्त वारंवार.
उपचार आणि घरगुती उपाय (Remedies and Lifestyle Tips)
- द्रवसेवनाचे प्रमाण आणि वेग तपासा, चहा, कॉफी, फिजी ड्रिंक्स पिणे कमी करा.
- टाइम्ड वॉइडिंग (Timed Voiding): ठराविक वेळेनंतर लघवी करा, “ज्यास्त काळ वाट पाहणे टाळा”.
- पेल्विक फ्लोर व्यायाम (Pelvic Floor Exercises) मूत्राशय नियंत्रण सुधारतो.
डॉ. खान म्हणतात: “सतत लघवी येणे नेहमीच गंभीर नसते, पण त्रास निर्माण करणारी किंवा दीर्घकाळ टिकणारी लक्षणे दुर्लक्षित

