Bladder Cancer Symptoms : रोजच्या धावपळीच्या आयुष्यात वांरवांर लघवी येणे किंवा लघवी करताना सौम्य जळजळ होणे ही सामान्य समस्या वाटू शकते जी सहसा कमी पाणी पिणे किंवा सामान्य युरिन इन्फेक्शन(UTI)चे परिणाम असल्याचे मानून दुर्लक्ष केले जाऊ शकते पण तुम्हाला माहित आहे का, हे छोटे छोटे लक्षणे एखाद्या मोठ्या आजाराचे संकेत असू शकतो. पुरषांच्या तुलनेमध्ये महिला आपल्या आरोग्याकडे जास्त दुर्लक्ष करतात. महिलांमध्ये युरिनसंबधीत समस्या जास्त असतात ज्याकडे त्या दुर्लक्ष करतात. कॅन्सर तज्ज्ञांच्यामते, महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय गंभीर आजारांना बळी पडण्याचे कारण ठरू शकते. मूत्राशयाचा (ब्लॅडर) कर्करोग एक असा आजार आहे जो महिलांना अँडवान्स स्टेजमध्ये पोहचल्यानंतर समजतो ज्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतो.

याबाबत आकाश हेल्थ केअरचे डायरेक्टर, सर्जिकल ऑन्कोलाजी विभागात कार्यरत असलेले डॉ. अरुण कुमार गिरी यांनी सांगितले की, ब्लॅडर कॅन्सर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये कमी प्रमाणात आढळतो पण महिलांमध्ये याचे निदान नेहमी उशीरा होते. यामुळे महिलांना या आजाराच्या प्रकरणांमध्ये सर्व्हायव्हल रेट पुरुषांच्या तुलनेत कमी दिसतो. डॉक्टरांच्या मते, महिला सुरुवातीच्या लक्षणांना युटीआय, स्त्री रोग संबधीत समस्या किंवा मेनोपॉज संबधीत समस्या असल्याचे मानतात ज्यामुळे उपचारांमध्ये विलंब होतो.याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेऊया, की ब्लॅडर कॅन्सर काय आहे, कोणत्या कारणांमुळे हा आजार होतो आणि त्याचे निदान आणि उपचार कसा केला जातो.

ब्लॅडर कॅन्सर काय आहे?

मूत्राशय(ब्लॅडर)शरीरातील तो अवयव आहे जिथे किडनीमधून येणारी लघवी साठवली जाते. जेव्हा अंतर्गत थराच्या पेशींमध्ये अनियंत्रित वाढ होऊ लागते किंवा ट्युमर(गाठी)च्या रुपात दिसू लागते तेव्हा ब्लॅडर कॅन्सर निर्माण होण्याची शक्यता असते. सामान्यत: ब्लॅडर कॅन्सर सुरुवातीला मुत्राशयाची आतील थर(यूरोथेलियल सेल्स)पासून होते. हे कॅन्सरचे सुरुवातीचा टप्पा केवळ मूत्राशयाच्या पृष्ठभागापर्यंत मर्यादित राहू शकतो पण योग्य वेळी उपचार न मिळल्यामुळे हे मूत्राशयाच्या गंभीर थर आणि शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहचू शकतो.

महिलांना ब्लॅडर कॅन्सर कोण कोणते सुरुवातीचे लक्षणे दिसतात

महिलांमध्ये लघवी करताना आग होणे किंवा वेदना होणे, वारंवार लघवी येणे किंवा लघवीतून रक्त येण्यासारखे लक्षणे दिसतात. कॅन्सर तज्ज्ञांच्या मतानुसार, जर लघवीमध्ये सातत्याने जळजळ होत असेल किंवा वारंवार टॉयलेटमध्ये जाण्याची गरज पडत असेल तर या लक्षणांना अजिबात हलक्यात घेऊ नका. हे ब्लॅडर कॅन्सरचे सुरुवातीच्या टप्याचा संकेत असू शकतो. कोणत्याबी परिस्थितीमध्ये गंभीर आजारांपासून वाचण्यासाठी या लक्षणांना योग्य वेळी ओळखा आणि योग्य पाऊल उचलणे अत्यंत आवश्यक आहे.

महिलांना ब्लॅडर कॅन्सरचे मुख्य कारण

ऑन्कोलॉजिस्टच्या मते, महिला आता पुरुषांपेक्षा जास्त धुम्रपान करत आहे जे ब्लॅडर कॅन्सरचे कारण असू शकते. याशिवाय दिर्घकाळ त्रास देणारे युटीआय किंवा क्रॉनिक युटीआय, ब्लॅडरमध्ये बराच काळापासून खडे साठले असल्यास किंवा काही औद्यिगिक रसायानांच्या संपर्कात आल्यास हे या कँन्सरचा धोका वाढू शकतो. पण ज्या लोकांना केमिकल इंडस्ट्री किंवा फॅक्ट्रीमध्ये काम करावे लागते त्यांना या आजाराचा धोका जास्त असू शकतो. लठ्ठपणा, मधूमेह आणि शारिरीक हालचाल कमी असल्याने कॅन्सरचे धोका वाढू शकतो.

महिलांमध्ये का होते उशीरा निदान?

तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये लघवीतून रक्त येणे किंवा वारंवार मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याच्या तक्रारींना अनेकदा सामान्य संसर्ग किंवा स्त्रीरोगविषयक समस्या समजण्याची चूक केली जाते. अनेक महिला सुरुवातीला स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतात, ज्यामुळे कर्करोग तपासणीस विलंब होतो. शिवाय, रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव आणि लघवीतील रक्त यांमधील फरक ओळखणे कधीकधी कठीण होऊ शकते, ज्यामुळे या कर्करोगाचे निदान होण्यास आणखी विलंब होतो.

मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान कसे केले जाते?

मूत्राशयाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी अनेक चाचण्या केल्या जातात. सर्वप्रथम डॉक्टर रुग्णाच्या कौटुंबिक वैद्यकीय इतिहासाची तपासणी करतात आणि त्यानंतर सिस्टोस्कोपी नावाची चाचणी केली जाते, ज्यामध्ये एका पातळ दुर्बिणीद्वारे मूत्राशयाच्या आतील भागाची तपासणी केली जाते. जर कोणतीही असामान्य गाठ किंवा व्रण दिसला, तर त्याची बायोप्सी केली जाते. याव्यतिरिक्त, कर्करोगाचा टप्पा आणि त्याचा प्रसार शोधण्यासाठी सीटी स्कॅन, एमआरआय आणि पीईटी-सीटी सारख्या इमेजिंग चाचण्यांचा वापर केला जातो.

मूत्राशयाच्या कर्करोगासाठी आवश्यक चाचण्या

मूत्र चाचणी, सिस्टोस्कोपी (दुर्बिणीद्वारे मूत्राशयाची तपासणी), बायोप्सी, सीटी स्कॅन आणि एमआरआय यांसारख्या चाचण्या केल्या जातात.

  • मूत्राशयाच्या कर्करोगाची धोक्याची चिन्हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
  • आहार आणि व्यायामाशिवाय वजन कमी होणे,
  • सतत ताप येणे,
  • लघवी किंवा शौचाच्या सवयींमध्ये बदल होणे,
  • शरीरात दीर्घकाळ टिकणारी गाठ हे मूत्राशयाच्या कर्करोगाचे किंवा इतर कोणत्याही कर्करोगाचे धोक्याचे लक्षण असू शकते.

मूत्राशयाचा कर्करोग टाळण्याचे उपाय

डॉक्टरांच्या मते, धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे हा मूत्राशयाचा कर्करोग टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. मद्यपानावर मर्यादा घालणे, नियमित शारीरिक हालचाल, वजन नियंत्रण आणि संतुलित आहार यामुळे देखील धोका कमी होऊ शकतो. कर्करोगासारखे आजार टाळण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचे सेवन वाढवा. आहारात फळे आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. तेलकट, चरबीयुक्त पदार्थ, अतिरिक्त चरबी आणि लाल मांस यांचे सेवन नियंत्रित करा.

महिलांसाठी तज्ज्ञांचा सल्ला

तज्ञांच्या मते, जर कोणत्याही महिलेला लघवीतून रक्त येत असेल, वारंवार मूत्रमार्गाचा संसर्ग होत असेल किंवा लघवीशी संबंधित इतर कोणतीही समस्या दीर्घकाळापासून जाणवत असेल, तर त्यांनी ताबडतोब मूत्ररोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान वेळेवर आणि सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास उपचार अधिक प्रभावी ठरू शकतात.