Friendship Day 2024 : मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर नातं आहे. आयुष्यात कधीही कोणती समस्या आली तरी हक्काचा मित्र किंवा मैत्रीण कायम आपल्याबरोबर असते. हल्ली नोकरी आणि शिक्षणासाठी आपण घराबाहेर पडतो, गाव शहर सोडतो त्यामुळे अनेकदा आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींपासून आपण दूर जातो पण असं म्हणतात खरी मैत्री ही कधीही तुटत नाही. दूर राहूनही मैत्री निभावता येते. जरी अशी मैत्री निभावणे, हे आव्हान वाटत असले तरी याच छोट्या छोट्या गोष्टींमुळे मैत्रीचे नाते आणखी घट्ट होते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल दूर राहूनही मैत्री कशी निभावायची? मैत्रीचे नाते कसे घट्ट करायचे?
दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिवस साजरा केला जातो. याच मैत्री दिना निमित्त आज आम्ही तुम्हाला पाच टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या दूर राहणाऱ्या मित्र मैत्रिणींबरोबरचे नाते घट्ट करू शकता आणि यंदाचा फ्रेंडशिप डे त्यांच्याबरोबर साजरा करू शकता. जाणून घेऊ या त्या पाच गोष्टी कोणत्या?

  • तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना नियमित व्हिडीओ कॉल करा. आठवड्यातून एकदा व्हिडीओ कॉल करा किंवा सतत मेसेजवर बोलत राहा. एकमेकांचे चेहरे पाहिल्याने तुमच्यातील नाते घट्ट होऊ शकते. तुम्ही मित्र मैत्रीणींबरोबर कॉलवर बोलताना एकाच वेळी सारखा पदार्थ बनवू शकता.
  • जरी तुम्ही दूर राहता तरी अशा गोष्टी करा ज्या गोष्टींचा तुम्ही एकत्र आनंद घेऊ शकता. उदा. ऑनलाइन गेम्स, दोघांनी एकाच वेळी एकच पुस्तक वाचणे आणि त्यावर चर्चा करणे, किंवा एकत्र ऑनलाइन वर्कआउट करणे. लहान मोठे क्षण एकमेकांबरोबर शेअर केल्याने तुमचे नाते आणखी घट्ट होईल आणि तुम्ही नवीन आठवणी निर्माण करू शकणार.
  • जरी तुम्ही दूर राहत असले तरी एखादा खास क्षण किंवा दिवस तुम्ही एकत्रित साजरा करू शकता. उदा. ऑनलाइन वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा करायचा, प्लॅन करा. तुम्ही त्यांना ऑनलाइन गिफ्ट पाठवू शकता, ऑनलाइन पार्टी आयोजित करू शकता.
  • मित्रांकडून गिफ्ट मिळणे, यापेक्षा दुसरा आनंद कोणताही नाही. एखादी खास वस्तू पाठवून तुम्ही त्यांच्याविषयी तुमच्या मनात असलेली काळजी किंवा प्रेम व्यक्त करू शकता. तुम्ही मित्राला एखादे भावनिक पत्र पाठवू शकता, फोटो पाठवू शकता किंवा तुमच्या मित्र मैत्रिणीला आवडत असलेल्या गोष्टी त्यांच्यासाठी करू शकता. यामुळे तुमची मैत्री आणखी घट्ट होईल.
  • एखाद्या डिजिटल प्रोजेक्टवर एकत्र काम करा. यामुळे तुमच्या नात्यात उत्साह निर्माण होईल. तुम्ही लिहिलेला एखादा ब्लॉग त्यांना पाठवा किंवा तुमची एकत्र प्ले लिस्ट तयार करा. तुमच्या आवडत्या क्षणांचा डिजिटल फोटो अल्बम तयार करा

Ganpati powerful stotram and mantras
Ganesh Chaturthi 2024 : फक्त मोदक आणि दूर्वाच नाही ‘हे’ प्रभावी स्तोत्र आणि मंत्रही आहेत बाप्पाला प्रिय; नियमित पठण केल्यास बाप्पा देईल भरपूर आशीर्वाद
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Parents silent actions affect children
पालकांच्या निशब्द कृतीचा फटका
parental challenges, children s independence, generational tensions, family dynamics, emotional support, parent child relationship,
सांधा बदलताना : कळा ज्या लागल्या जीवा
parenting friendship the role of parenting in shaping the friendship
इतिश्री: मैत्रीतलं पालकत्व
Animal fight video deer vs crocodile video
VIDEO: “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे”, हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
Shev Paratha Recipe in marathi how to make
मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाईत झटपट बनवा शेव पराठा; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Boy hold poster of fathers love in front of school video goes viral
VIDEO: शाळेबाहेर तरुणानं झळकवली अशी पाटी की लहान मुलेही थांबून विचार करायला लागली; पाटीची सोशल मीडियावर तुफान चर्चा