Betel Leaves health Benefits: कित्येक वर्षांपासून भारतात लोक नागवेलीची पान (विड्याचे पान किंवा खाऊचे पान) खातात. अगदी महिला देखीलविड्याचे पान आवडीने खातात. जर तुम्ही खाऊचे पान खात नसाल तर लवकर खायला सुरुवात करू शकता. कारण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कफपासून पचन आणि मूड स्विंगपर्यंत पानाचे अनेक घरगुती फायदे आहे. पान हे भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. पूजापासून लग्नापर्यंत अनेक विधींमध्ये या विड्याच्या पानांचा समावेश होतो. पूर्वीच्या काळात महिला रोज जेवल्यानंतर पान खात असे पण आता या सवयीला चुकीची सवय मानली जाते कारण अनेक आता अनेकदा पुरुषचं खाऊचे पान खाताना दिसतात. पण प्रत्यक्षाचे हे पान तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषत: महिलांसाठी नागवेलीच्या पानांचे आवर्जून सेवन केले पाहिजे. महिलांमध्ये हार्मोन्समुळे अनेकदा मूड बदलत असतात त्यावर उत्तम उपाय आहे कारण विड्याचे पान खाल्याने मूड सुधारतो. चला या नागवेलीच्या पानाच्या अनेक फायद्यांबाबत आणि खाण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ या.
नागवेलीची पान (विड्याचे पान किंवा खाऊचे पान) खाण्याचे फायदे (Betel Leaves health Benefits)
पचन सुधारते (Digestion Improve)
जेवनांनंतर पान खाण्याची परंपरा उगाच सुरु झालेली नाही. नागवेलीच्या पानांमध्ये असलेले एंजाइम्स आणि नैसर्गिक तेल पचनक्रिया सक्रिय करते. त्यामुळे जेवण लवकर पचते आणि गॅस, अॅसिडीटी किंवा पोट फुगण्यासारखी समस्यांपासून सुटका मिळते.
कफापासून मिळते सुटका (Gets rid of phlegm )
ऋतू बदलल्यानंतर सर्दी, पडसे, खोकला आणि कफ सारखी समस्या सामान्य असते. अशा परिस्थितीमध्ये खाऊच्या पानांमध्ये असलेले अँटी इन्फ्लमेंटरी आणि अँटी ऑक्सिडेंट गुण कमालीचे फायदे देतात. जर या पानांना गरम पाण्यात उकळून वाफ घेतल्यास छातीत साचलेला कफ मोकळा होतो आणि श्वास घेण्यास त्रास होत नाही.
मूड सुधारते (Improve Mood)
जर तुम्ही थकला असाल, तणावात असाल किंवा उदास वाटत असेल तर तुम्ही पानांचे सेवन करून तुमचा मूड सुधारू शकतो. त्यामुळे असलेले नैसर्गिक पोषक तत्व मेंदूतील एसिटायलकोलाइन नावाचे रसायन संतुलित करते ज्यामुळे मनात शांती आणि उर्जा वाढल्याचे जाणवते.
तोंडाच्या स्वच्छतेसाठी फायदेशीर (Improve Oral Hygine)
विड्याच्या पानांमध्ये असलेले अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल तत्वांमुळे श्वासांना येणारा दुर्गंध करण्याशिवाय हिरड्यादेखील मजबूत करते. एवढेच नाही तर शरीरामध्ये उपलब्ध असलेले किटाणूंना मारण्यासाठी फायदेशीर ठरते. ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो.
नागवेलीचे पान कधी आणि कसे खावे? (When and how to eat Betal leaves?)
जर तुम्ही आरोग्यासाठी पान खाण्यासाठी इच्छूक असाल तर लक्षात ठेवा त्यामध्ये कात, चूना किंवा सुपारी घालू नका किंवा खूप कमी प्रमाणात वापरा. या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक असतात. खाल्यानंतर एक किंवा दोन स्वच्छ हिरवे पान चावून खाणे किंवा त्याचा काढा पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.
