scorecardresearch

वजन कमी करण्यापासून ते मधुमेह नियंत्रणापर्यंत, जाणून घ्या ‘या’ फुलाच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे

वजन कमी करणे हे तितके सोपे नाही कारण त्यासाठी काटेकोर आहार आणि योग्य व्यायामाची आवश्यकता असते.

वजन कमी करण्यापासून ते मधुमेह नियंत्रणापर्यंत, जाणून घ्या ‘या’ फुलाच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे
प्रातिनिधिक फोटो

Weight Loss and Diabetes: स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, त्यापैकी एक म्हणजे वजन कमी करणे. पण हे काम तितके सोपे नाही कारण त्यासाठी काटेकोर आहार आणि योग्य व्यायामाची आवश्यकता असते. तथापि, एका विशिष्ट गोष्टीचे सेवन करून आपण वाढती पोटाची चरबी कमी करू शकतो. अर्थात यासोबत योग्य आहार आणि व्यायामाचीही गरज आहे.

तुम्हाला सूर्यफूल नक्की माहित असेल. या फुलाचं टतेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. पण, तुम्हाला माहित आहे का की या फुलाच्या बिया देखील औषधी गुणांनी परिपूर्ण मानल्या जातात. याच्या सेवनाने शरीराला खूप फायदा होतो. तुम्ही ते ओट्स, स्मूदी किंवा सलाडच्या स्वरूपात नाश्त्यात खाऊ शकता. सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने तुम्हाला लोह, झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस, खनिजे, आहारातील फायबर, आवश्यक फॅटी ऍसिडस् कॉपर, मॅंगनीज, पोटॅशियम, कॅल्शियम आणि सेलेनियम मिळतात, जे आरोग्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहेत.

(हे ही वाचा: फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेपासूनही बनवू शकता मऊ आणि लुसलुशीत चपाती; फॉलो करा ‘या’ टिप्स)

(फोटो: Pixabay)

(हे ही वाचा: Health Tips: निरोगी यकृतासाठी ‘या’ मसाल्यांचे करा सेवन)

वजन कमी करण्यास मदत

रोजच्या आहारात सूर्यफुलाच्या बियांचा समावेश केल्याने वाढते वजन कमी होण्यास मदत होते, कारण ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी लवकर वितळते.

(हे ही वाचा: Paneer vs Tofu : पनीर आणि टोफूमध्ये काय आहे फरक?)

मधुमेहावर प्रभावी

मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या रोजच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते, अशा परिस्थितीत ते सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करू शकतात. या बियांमध्ये कार्बोहायड्रेट खूप कमी आढळते तसेच पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट देखील असते. यामुळेच ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

(हे ही वाचा: Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाची शक्यता कुणास अधिक असते? जाणून घ्या)

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. यावर आवर्जून वैद्यकीय सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-06-2022 at 12:56 IST

संबंधित बातम्या