यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्याला फॅटी लिव्हर म्हणतात. अतिरिक्त चर्बी जमा झाल्यास यकृताचे कार्य विस्कळीत होऊ शकते. चर्बीचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक झाल्यास यकृत निष्क्रिय होऊ शकते किंवा यकृताचा कर्करोग होऊ शकतो. तुमच्या यकृतामध्ये चर्बीचे प्रमाण अधिक असेल आणि ते पूर्ण कार्यक्षमतेने काम करत नसेल तर तुम्हाला सुस्ती, थकवा जाणवू शकतो, तसेच ओटीपोटामध्ये वेदना जाणवू शकतात. फॅटी लिव्हर आजारापासून सुटका मिळू शकते. यासाठी तुम्हाला आहारामध्ये थोडे बदल करावे लागतील.

फॅटी लिव्हरपासून सुटका मिळण्यासाठी आहारात या फळांचा समावेश करा.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?

१) ग्रेपफ्रुट

ग्रेपफ्रुट फॅटी लिव्हर झाल्यानंतर यकृताला झालेले नुकसान भरून काढण्यात मदत करते. ग्रेपफ्रुटमधील जीवनसत्व क आणि अँटि-ऑक्सिडेंट यृकताचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करतात, असे मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील आहारतज्ज्ञ डॉ. जिनल पटेल यांचे मत आहे.

२) अ‍ॅव्होकाडो

अ‍ॅव्होकाडोमध्ये चागले कोलेस्टेरॉल असते. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार असणाऱ्यांना हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. अ‍ॅव्होकाडो चर्बी किंवा ब्लड लिपिड कमी करून यकृताला होणारी हानी टाळण्यास मदत करू शकते. नारायणा हृदयालय येथील वरिष्ठ वैद्यकीय आहारतज्ज्ञ श्रुती भरद्वाज या फॅटी लिव्हर समस्येपासून सुटका मिळण्यासाठी हे फळ खाण्याचा सल्ला देतात.

(Real egg check : बनवाट अंड्यांपासून सावध राहा, खरा अंडा ओळखण्यासाठी ‘हे’ करा)

३) ब्ल्युबेरी

फॅटी लिव्हरची समस्या असल्यास तुम्ही ब्ल्युबेरीचे सेवन करू शकता. ब्ल्युबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटि – ऑक्सिडेंट असतात जे फॅटी लिव्हर आणि यकृतासंबंधी इतर समस्या सोडवण्यात मदत करू शकतात.

४) केळी

आहारतज्ज्ञ फॅटी लिव्हर आजार असल्यास केळी खाण्याचा सल्ला देतात. केळीमध्ये जीवनसत्व ब ६, क, अ आढळते आणि त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिरोधक स्टार्च असते जे यकृताच्या आरोग्यासाठी चांगले असते.

(दुसरे बाळ जन्माला घालण्याची योजना आहे? त्या आधी ‘या’ गोष्टी तपासा, पालक्तवाचा प्रवास सोपा होईल)

५) द्राक्षे

द्राक्षांमध्ये रेस्वेराट्रॉलचे प्रमाण अधिक असते जे यकृताचे आरोग्य सुधारण्यात मदत करते आणि शरीर निरोगी ठेवते, असे डॉ. पटेलचे म्हणणे आहे.

६) लिंबू

डॉ. पटेल यांच्या मते, लिंबूमध्ये सिट्रिक अ‍ॅसिड, पोटॅशियम, जीवनसत्व क, बायोफ्लावोनॉइड्स असतात जे डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतात आणि जळजळ कमी करतात. फॅटी लिव्हरची समस्या असल्यास लिंबूचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

७) सफरचंद

यकृत निरोगी ठेवण्यासाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. सफरचंदात फायबर असते. सफरचंद यकृत डिटॉक्स करण्यात मदत करू शकते. फॅटी लिव्हरची समस्या असलेल्यांनी निरोगी खाण्याच्या सवयींचा अवलंब करावा. जंक फूड, मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले अन्न खायचे टाळावे.