Gallstones Stones Symptoms, Causes And Prevention Tips : दुपारी किंवा रात्री जेवण केल्यानंतर शरीराला उर्जा मिळाण्याऐवजी जर पोट दुखत असेल किंवा पोटात मुरडा येत असेल तर हे चिंतेचे कारण असू शकते. कधी कधी पोट दुखी होत असले तर पचनासंबधीत समस्या जसे की गॅस आणि अॅसिटीडी , घाई घाईत जेवणे, तेलकट पदार्थ खाणे किंवा तणावाचा परिणाम असू शकतो. पण जर हा त्रास वारंवार होत असेल तर ते एखाद्या गंभीर आजराचे लक्षण असू शकते. हेल्थ तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, जेवणाच्या त्वरित नंतर सरु होणारे सामान्य अॅसिटिडीपासून पोटदुखीपर्यंत अंतर्गत समस्याचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.

इन्स्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये, भूलतज्ञ आणि इंटरव्हेंशनल पेन मेडिसिन तज्ञ डॉ. कुणाल सूद यांनी सांगितले की, जेवल्यानंतर होणारी तीव्र पोटदुखी अनेकदा अपचन नव्हे तर पित्ताशयातील खड्यांचे लक्षण असू शकते. तज्ज्ञांच्या मते पिताशयात खडे झाल्या किंवा पित्ताचे खडे हे घन स्वरुपातील कण असतात जे पित्तामध्ये कोलेस्ट्रॉल किंवा अन्य तत्वांचे प्रमाण अधिक वाढल्यावर आणि ते अधिक घट्ट झाल्यावर हे खडे तयार होऊ शकतात. पण पित्ताचे खडे अत्यंत सामान्य आहे आणि कोणत्याही लक्षणाशिवाय ते होऊ शकतात पण मुख्य समस्या तेव्हा होते जेव्हा पित्ताचा सामान्य प्रवाहात अडथळा निर्माण होतो.

पित्ताचे खडे तयार होण्यामुळे वेदना का होते?

डॉ. सुद यांच्या मतानुसार, जेव्हा पित्ताचे खडे पित्ताच्या नलिकामध्ये(Bile Duct) अडथळा निर्माण करतो तेव्हा बिलियर कोलिक(Biliary Colic)नावाची स्थिती निर्माण होते. ज्यामुळे उजव्याबाजूला पोटाच्या वरच्या भागात किंवा पाठीच्या वरच्या भागात तीव्र किंवा सहन न होणारी वेदना होऊ शकते. तज्ज्ञांच्यामते, ही वेदन सामन्यता जेवल्यानंतर, विशेषत: तेलकट पदार्थांचे सेवन केल्यानंतर होते.
याशिवाय मळमळ, उलटी देखील होऊ शकते आणि एकदा सुरु झालेली वेदना कित्येक तास जाणवू शकते. डॉ. सूद यांच्या मते, ही वेदनाचा धोका महिलांमध्ये, जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ लोकांना, मधुमेही किंवा ज्याचे वजन वेगात वाढते किंवा कमी होते, क्रॅस डायटिंग करणाऱ्यांना होऊ शकते.

अपचन किंवा पित्ताचे खडे , वेदनेचे कारण कसे ओळखावे?

फोर्टिस हॉस्पिटलचे सर्जिकल गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. प्रणव होन्नावर श्रीनवास सांगतात की, सामान्य अपचनचा त्रास असेल तर सहसा पोटाचा वरचा भागात सामन्य जळजळ किंवा जडपणा अथवा गॅस जाणवतो जो एंटासिड घेतल्यानंतर बरा होतो किंवा आपोआप कमी होतो. पित्ताचे खड्यांचा त्रासाची वेदना वेगळी असते. पित्ताशयाचा त्रास असल्यास पोटाच्या वरच्या भागात किंवा उजव्या बाजूला तीव्र किंवा पिळवटल्यासारखी (कळ येणारी) वेदना जाणवू शकते. ही वेदना जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर होते. विशेषत: तेलकट पदार्थांचे सेवन केल्यानंतर ही वेदना वाढते. ही वेदना उजव्या खांदा किंवा पाठीपर्यंत वाढू शकते आणि कित्येक तास त्रास होऊ शकतो. एंटिसीड सारखे औषधामुळे ही वेदना बरी होत नाही.

हे लक्षण दिसल्यास डॉक्टरांना भेटा

डॉ. श्रीनिवासन यांच्या मतानुसार, जर तुम्हाला जेवल्यानंतर पोट दुखत असेल आणि ही वेदना वारंवार होत असेल, वेदनेची तीव्रता खूप जास्त असेल, उलटी, मळमळ होत असेल किंवा ताप येत असेल, डोळ्यांखाली त्वचा पिवळी पडली असेल किंवा लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर ही समस्या पिताशयातील खड्यांसबधीत असून शकते, अशा स्थितीत लवकरात लवकर डॉक्टरांची भेट घ्या.

लठ्ठपणा, मधुमेह किंवा झटपट वजन कमी होत असेल धोका का वाढतो?

डॉ. श्रीनिवासन सांगतात की, पित्ताचे खडे तेव्हा निर्माण होतात जेव्हा पित्ताचे संतलुन बिघडते आणि त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. लठ्ठपणामध्ये यकृत जास्त कोलेस्ट्रल तयार करते ज्यामुळे कोलेस्ट्रोलचे खडे तयार होण्याचा धोका वाढतो. झटपट वजन कमी झाल्याल यकृतावर अतिरक्त कोलेस्ट्रॉल पित्तामध्ये सोडतो आणि पित्ताशयाच्या कार्याचा वेग मंदावतो ज्यामुळे पित्त साचू लागते.
मधुमेहींमध्ये फॅट मेटाबॉलिज्म आणि पित्ताशयाची कार्यक्षमतेवर परिणाम होते ज्यामुळे पित्ताटे खडे वाढण्याची शक्यता आहे.

पित्ताशयावरील दबाव कमी करण्यासाठी काय करावे?

डॉ. श्रीनिवासन सांगतात की, जर तुम्हाला पित्ताशयावरील ताण कमी करायचा असेल तर तुम्ही नियमित वेळवर आणि संतुलित जेवण करा. बराच काळ उपाशी राहणे टाळा, फळ, भाज्या आणि संपूर्ण धान्य सारखे फायबर युक्त खाद्य पदार्थ खा. ठराविक प्रमाणात हेल्दी फॅटचे सेवन करा. तळलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ अतिप्रमाणात खाने टाळा.
संतृप्त चरबी( Saturated Fat) चे सेवन कमी करा. क्रॅश डायटिंग ऐवजी हळू हळू आणि आरोग्यदायी पद्धतीने वजन कमी करा.

डॉक्टरांची मदत केव्हा घ्यावी?

  • जर तुमच्या शरीरात खालील लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांची मदत घ्या
  • जेवल्यानंतर होणारी पोटदुखी
  • वारंवार होणारी पोटदुखी
  • तीव्र वेदनादायक पोटदुखी जी कालंतराने वाढत जाते
  • उलटी, ताप किंवा काविळीसह खांदा, पाठीपर्यंत वेदना होणे

डॉ. श्रीनिवासन सांगतात की,वारंवार एंटासिड घेऊन वेदना कमी करण्याचा प्रयत्नामुळे योग्य आजाराचे निदान करण्यास होतो. त्यामुळे पित्ताशयातील संसर्ग (Gallbladder Infection) किंवा पँक्रियाज सारक्या गंभीर गुंतागुतीच्या स्थिती विकसित होऊ शकतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे.