Ganesh Chaturthi Wishes Marathi: ताशांचा आवाज तरारारा झाला अन् गणपती माझा नाचत आला.. म्हणत अखेरीस तो दिवस उजाडलाच. ३६५ दिवसांची प्रतीक्षा संपवून बाप्पा तुमच्या आमच्या घरी आले आहेत.

अलीकडे कोणताच सण ऑनलाईन शुभेच्छा दिल्याशिवाय पूर्ण होत नाही असं म्हणतात. अशा वेळी तुम्हालाही गणेश चतुर्थीला WhatsApp Status, Facebook, Instagram वर पोस्ट, स्टोरीज शेअर करून गणेश चतुर्थी निमित्त शुभेच्छा देणारे HD फोटो शेअर करायचे असतील तर आजच ही शुभेच्छापत्र फ्रीमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता. तुमच्या मनातील भाव अगदी सुंदर शब्दात व्यक्त करणाऱ्या काही गणेशोत्सवाच्या मराठमोळ्या शुभेच्छा पाहूया..

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा (Ganesh Chaturthi Wishes in Marathi)

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
बाप्पा सुखी ठेव आम्हा सर्वांना
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

मोरयाच्या जयघोषाने आज,
आनंद भरू दे मनामनात,
बाप्पाची कृपादृष्टी राहो,
सुख नांदो प्रत्येक घरात
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

गणपती बाप्पाच्या आगमनाने
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

गोड गोड मोदक
दुर्वा फुलांचा हार
पाटावर बसला माझा गणराया छान
एका हातात लाडू अन् दुसऱ्या हाताने आशीर्वाद
माझ्या गणरायाचा लाखात एक मान
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे
कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मराठी फोटो (Ganesh Chaturthi Marathi Wishes)

तुमच्या आयुष्यातला आनंद विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा
अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात
आयुष्य त्याच्या सोंडेइतके लांब असावे आणि
आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता
विघ्न विनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी
गणपती बाप्पा मोरया!

गणेश चतुर्थी शुभेच्छा मराठी फोटो (Ganesh Chaturthi Photos Marathi)

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य, यश आणि भरभराट घेऊन येवो गणराया
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

अवघी सुष्टी करतेय नमन
झालंय माझ्या बाप्पाचं आगमन
गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!