हिंदू धर्मात प्रत्येक तिथीला महत्व आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणपतीची आराधना केली जाते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. मार्गशीष महिना संपला असून आता पौष महिना सुरु झाला आहे. पौष महिन्यानंतरी शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ६ जानेवारीला आहे. या दिवशी गणपतीचा पूजा विधी केला जातो. या दिवशी उपासना केल्यानंतर जीवनातील दु:ख आणि संकटं सौम्य होतात, अशी मान्यता आहे. हिंदू धर्मात कोणत्याही कार्याची पूजा करण्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने केली जाते. पंचांगानुसार शुक्ल पक्षातील चतुर्थी ५ जानेवारीला दुपारी २ वाजून ३४ मिनिटांनी सुरु होते आणि ६ जानेवारीला दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी संपते. ६ जानेवारीला ११ वाजून १५ मिनिटांपासून १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत गणपतीची पूजा विधी केला जाऊ शकते. विनायक चतुर्थीला या मंत्रांचा जप करा “ओम एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ति प्रचोदयात्”“गजाननम् भूत गणादि सेवितम्, कपित् य जम्भु फलसरा भिक्षितम्, उमसुतम् शोका विनशा करणम्, नमामि विघ्नहेश्वर पद पंकजम्”“वक्रतुण्ड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:, निर्विघ्नम् कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा” विनायक चतुर्थीचा पूजाविधी पूजास्थळाची साफसफाई आणि गंगाजल शिंपडाभगवान गणपतीला वस्त्र घालून दीप प्रज्वलित करागणपतीला सिंदूर तिलक लावा आणि पुष्पार्पण करागणपतीला दुर्वा प्रिय असून २१ दुर्वांची जुडी अर्पण करागणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवापूजा पूर्ण झाल्यावर आरती करा आणि झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागा