scorecardresearch

Premium

Health Tips: युरिक अ‍ॅसिड वाढले आहे? मग ‘हे’ चार घरगुती खाद्यपदार्थ वापरून पाहा; मिळेल आराम

सध्या प्रत्येकाचे जीवन हे धावपळीचे आणि ताणतणावाचे बनले आहे.

4 home remedies to reduce high uric acid level
युरिक अ‍ॅसिड शरीरातील सांध्यांमध्ये साठते. (Image Credit-Freepik)

सध्या प्रत्येकाचे जीवन हे धावपळीचे आणि ताणतणावाचे बनले आहे. त्यातच बदललेल्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे जेवणाच्या वेळा बदलत राहतात. वेळेवर जेवण होत नाही. यामुळे आपल्या आरोग्यावर देखील परिणाम होत असतो. यामुळे अनेकांच्या शरीरातली युरिक अ‍ॅसिड वाढते. युरिक अ‍ॅसिड एक प्रकारचे केमिकल आहे जे प्युरीनच्या अतिसेवनामुळे वाढते. युरिक अ‍ॅसिडची वाढलेली पातळी अनेक आरोग्याशी संबंधित समस्यांचे कारण बनते. युरिक अ‍ॅसिड जास्त करून शरीरातील सांध्यांमध्ये साठते. ज्यामुळे गुडघे आणि बोटे दुखू लागतात.

युरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे शरीरात काही विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. यामुळे पायांशी संबंधित काही आजार होऊ शकतात. जर का तुमच्या शरीरातली युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढली असेल तर काही खाद्य पदार्थ आज आपण पाहणार आहोत. ज्यामुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी सामान्य होण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. हे खाद्यपदार्थ कोणते आहेत आणि त्याचे सेवन कसे करायचे ते जाणून घेऊयात.

Masala Dal
Masala Dal : 10 मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक मसाला डाळ, लगेच रेसिपी नोट करा
5 best oil useful for hair growth
Hair Care: दाट आणि लांब केस हवे आहेत? मग करा ‘या’ पाच तेलांचा वापर, जाणून घ्या
rice flour face pack benifits
Beauty Tips: चेहरा तजेलदार बनवायचा आहे? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पिठाचा वापर एकदा करून पाहाच
How_To_Store_Dry_Fruit
सुका मेवा साठवताना ‘या’ टिप्स वापरून पाहा; वर्षभर राहतील ताजे अन् खराबही होणार नाही

हेही वाचा : Beauty Tips: चेहरा तजेलदार बनवायचा आहे? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पिठाचा वापर एकदा करून पाहाच

हाय युरिक ऍसिड कमी करण्यासाठीचे खाद्यपदार्थ

लसूण

युरीक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी लसूण खाणे उपयुक्त ठरते. तुम्ही कच्चा लसूण थोडासा चिरून तोंडात ठेवून चघळायचा आहे. लसूण खाल्ल्याने युरिक अ‍ॅसिडची वाढलेली पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच यामुळे संधिरोग देखील कमी होऊ शकतात. लसणाचे सेवन शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

मेथीचे दाणे

मेथीच्या दाण्यांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. यांचे सेवन केल्यास शरीरातील युरिक अ‍ॅसिड कमी होऊ शकते. एक चमचा मेथीचे दाणे अर्धा काप पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी हे दाणे चावून चावून खावेत. या प्रकारे तुम्ही मेथीच्या दाण्यांचे सेवन करू शकता. मेथीच्या दाण्यांमुळे सांध्यामध्ये असलेली सूज कमी होण्यास व युरिक अ‍ॅसिडची वाढलेली पातळी कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा : Health Special: गणपती बाप्पाच्या लाडक्या मोदकाचं कॅलरी गणित

ओवा

युरिक अ‍ॅसिडची वाढलेली पातळी कमी करण्यासाठी तुम्ही ओवा देखील खाऊ शकता. अर्धा चमचा ओवा आणि आल्याचा एक लहानसा तुकडा एक कप पाण्यात टाकून उकळवा. त्यानंतर ते पाणी गाळून प्यावे. हे पाणी सकाळी व संध्याकाळी थोड्या थोड्या प्रमाणात प्यावे.

कोथिंबीर

धने आणि कोथिंबीर दोन्ही युरिक अ‍ॅसिडसाठी फायदेशीर ठरतात. धने हे अँटी ऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. तसेच युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Garlic ginger fenugreek seeds ajwain 4 home remedies reduce high uric acid level tmb 01

First published on: 20-09-2023 at 10:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×