scorecardresearch

Premium

तव्यावर एक लसूण फिरवून मग करा अंड्याचं हाफ फ्राय; परफेक्ट जुगाड वाचवेल तुमचा वेळ, पाहा Video

Omelet Recipe Video: अंड्याच्या पांढऱ्या भागाचं ऑम्लेट, किंवा सनी साईड अप असं हाफ फ्राय हे झटपट पदार्थ साध्या जेवणाची रंगत वाढवतात. आज हेच हाफ फ्राय, ऑम्लेट बनवण्यासाठी आपण एक जुगाड पाहणार आहोत.लाइफस्टाइल

Garlic Ke Upay Before Making Perfect omelet Half Fry Jugaadu Hack That Will Save Money Time Watch Video Marathi Cooking Tips
ऑम्लेटला येईल परफेक्ट क्रिस्प अशी हॅक (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Perfect Omelet Hack Video: व्हेजिटेरियन, नॉन- व्हेजिटेरियन मंडळींप्रमाणे ‘एगिटेरियन’ हा प्रकार सुद्धा तुम्ही ऐकून असाल. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सोपं उत्तर सांगायचं तर, अशी मंडळी जी शाकाहारी आहेत पण शुद्ध शाकाहारी नाही, त्यांना अंडी खाल्लेली चालतात. खरंतर याची काही अधिकृत परिभाषा नाही पण लोकांच्या आवडीनिवडीतून हा ट्रेंडी शब्द वापरला जातो. बटाट्याप्रमाणे अंड्यांच्या सुद्धा अनेक प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात पण सगळ्यांची आवडती आणि विशेषतः अगदी पाच मिनिटात करून होणारी रेसिपी म्हणजे ऑम्लेट. भारतीय कांदा टोमॅटो मसाला घातलेला अंड्याचा पोळा, इंग्लिश ब्रेकफास्टमधील अंड्याच्या पांढऱ्या भागाचं ऑम्लेट, किंवा सनी साईड अप असं हाफ फ्राय हे झटपट पदार्थ साध्या जेवणाची रंगत वाढवतात. आज हेच हाफ फ्राय, ऑम्लेट बनवण्यासाठी आपण एक जुगाड पाहणार आहोत.

@masteringhacks या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की साधारणतः जेव्हा आपण ऑम्लेट किंवा हाफ फ्राय साठी अंडं तव्यावर फोडतो तेव्हा ते तव्याच्या सपाट आकारामुळे कडेला वाहत जातं. गॅसची आच ही मुख्यतः मधल्या भागात जास्त असणार असल्याने कडेला अंडं शिजायला किंवा तो हवा तसा कुरकुरीतपणा येत नाही. अशावेळी व्हायरल होणाऱ्या हॅकनुसार, तुम्हाला फक्त लसणाची एक पाकळी तव्याच्या मध्यभागी फिरवायची आहे. गोलाकार दिशेने ही लसूण फिरवा आणि मग अंडं फोडून तव्यावर टाका. यामुळे अंडं वाहून जात नाही आणि चटकन शिजलेलं क्रिस्प हाफ फ्राय तयार करता येईल.

Jugadu Women Made Sandwich Without Bread or Maida Use Dosa Batter In Toaster With Cheese Unique Breakfast Recipe Idea
डोक्याचा पूर्ण उपयोग! मैद्याच्या ब्रेडशिवाय बनवलं डोश्याचं क्लब सँडविच, तुम्हाला प्रयोग कसा वाटतोय बघा
Trick For Lemon Tree Add turmeric water to the root of a lemon tree, the plant will get lots of lemons throughout the year
Trick For Lemon Tree: लिंबाच्या रोपाच्या मुळाशी टाका ‘या’ गोष्टी, वर्षभर रोपाला येतील भरपूर लिंबू
Pomfret Fry easy recipe video
Sea food Recipe : घरच्याघरी खमंग पापलेट फ्राय कसा बनवायचा? पाहा ही रेसिपी
DIY Health Tips coconut water soaked sabja seeds benefits coconut water and sabja seeds drink to get rid of acidity weight loss constipation know how to consume this
दररोज नारळाच्या पाण्यात ‘हा’ पदार्थ टाकून प्या; वाढत्या वजनासह बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर?

ऑम्लेटला येईल परफेक्ट क्रिस्प, पाहा Video

शिवाय तुम्ही तवा सुद्धा थोडा खोलगट किंवा निदान सपाट असेल असे पाहावे वरच्या बाजूला उभट असलेल्या तव्यावरून अंडं वाहून जाण्याची शक्यता असते. शिवाय इतकं करूनही जर अंडं फोडल्यावर वाहूनच जात असेल तर कदाचित हे अंडंच फार जुनं असू शकतं. तुम्हाला ही टीप कशी वाटतेय हे कमेंट करून नक्की कळवा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Garlic ke upay before making perfect omelet half fry jugaadu hack that will save money time watch video marathi cooking tips svs

First published on: 01-12-2023 at 20:53 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×