Gas Stove Safety Tips: पूर्वी घरोघरी चुलीवर स्वयंपाक केला जात असे. आजच्या काळात जर तुम्हाला स्वयंपाक करायचा असेल तर तुम्हाला जास्त त्रास घेण्याची करण्याची गरज नाही, कारण आता जवळपास प्रत्येकाच्या घरी एलपीजी गॅस असतो. या गॅसच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहजपणे स्वयंपाक करू शकता. गॅसमुळं अन्न शिजविणं सोपं झालं आहे, परंतु तो वापरताना खूप काळजी घ्यावी लागते. अन्यथा कोणताही अनुचित प्रकार व्हायला वेळ लागत नाही. चला तर मग गॅस वापरताना काय काळजी घेतली पाहिजे जाणून घेऊयात.

बर्नर प्रत्येक वेळी दोनदा तपासा –

Hotel Guests leave Behind the Most Unusual and unexpected Items
प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये लोक कोणत्या वस्तू सर्वात जास्त विसरतात?
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
coconut peel benefits 6 benefits of health from coconut
नारळाची साल फेकताय? थांबा! नारळाच्या सालीपासून आरोग्याला होणारे ‘हे’ ६ फायदे एकदा पाहाच
Kitchen Jugaad 6 easy ways to keep lizards out of your kitchen home in marathi
kitchen Jugaad : स्वयंपाकघरात पालींचा सुळसुळाट झालाय? वापरून पाहा ‘या’ सहा सोप्या ट्रिक्स; पाल काय झुरळ, किडेपण जातील पळून
Lemons Really Help With Acidity?
तुम्हाला पित्ताचा त्रास आहे का? मग आहारात लिंबाचं सेवन करा अन् आराम मिळवा
Woman Shares Unique Trick with Naphthalene Ball in Hot Water
डांबर गोळी गरम पाण्यात टाकताच कमाल झाली, महिलेनी सांगितला अनोखा जुगाड, पाहा VIDEO
Here Is How You Can Grow Your Eyebrows Faster and Thicker 10 tips
कमी खर्चात भुवया छान दाट व जाड करण्याचे १० सोपे उपाय; कसा वापर करायचा जाणून घ्या
How peanuts can help in weight loss
शेंगदाणे वजन कमी करण्यात कशी मदत करू शकतात? कसे करावे सेवन? जाणून घ्या…

एकदा तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर बर्नर बंद आहे का हे नेहमी तपासा. तसेच गॅस सुरु असताना जर बर्नर व्यवस्थित सुरु होत नसेल तर दुर्लक्ष करू नका. तसे झाल्यास गॅस शक्य तितक्या लवकर बंद करा, खिडक्या उघडा आणि पुन्हा प्रयत्न करण्यापूर्वी थोडी प्रतीक्षा करा. आणि तुम्ही झोपण्यापूर्वी गॅस पुन्हा एकदा बंद केला आहे का तपासा.

गॅस सिलिंडर आणि गॅसची पाइप यांची कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडून नियमित तपासणी करा. चांगल्या दर्जाची पाइप वापरा. स्वयंपाक झाल्यानंतर रेग्युलेटरचा स्वीच बंद करा.गॅसगळती झाल्यास दारे- खिडक्या उघडा. ट्यूब, लाइट सुरू करू नका. गॅसचा वास येत असल्यास काडेपेटी, लायटर, सिगारेट लायटर वापरू नका.मेणबत्ती सुरू असेल तर तत्काळ विझवा.रेग्युलेटरचा स्वीच बंद करा

स्वच्छ ठेवा – गॅस नेहमी स्वच्छ ठेवा. गलिच्छ गॅस धोकादायक ठरु शकतो. गॅस स्टोव्हवर पडणारे अन्न बर्नरची छिद्रे अडवते आणि गॅस बर्नरपर्यंत पूर्णपणे पोहोचत नाही. अशा परिस्थितीत गॅस तर वाया जातोच पण स्टोव्हला आग लागण्याचीही शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक वापरानंतर ओलसर कापडाने गॅस पुसून घेतला पाहिजे.

गॅस स्टोव्हवरील गंजांचे डाग काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याची मदत घेऊ शकता. यासाठी गरम पाण्यात लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा मिसळा. आता हे मिश्रण गॅस स्टोव्हवर लावा आणि जुन्या टूथब्रशने गॅस स्टोव्ह घासून स्वच्छ करा. यामुळे गॅस स्टोव्ह त्वरित चमकेल.

ज्वलनशील पदार्थ लांब ठेवा – आग लागू शकणारी कोणतीही गोष्ट तुमच्या गॅस स्टोव्हजवळ नसावी. जसे की, प्लॅस्टिकच्या पिशव्या, लाकडी चमचे, टॉवेल आणि त्या प्लास्टिकच्या बाटल्या. अपघात टाळण्यासाठी घरातील प्रत्येकाला हा नियम माहित असणे आवश्यक आहे. सिलिंडरला थेट ऊन, पाऊस मिळेल किंवा धूळ बसेल अशा ठिकाणी ठेवू नये. सिलिंडरवर कोणतेही भांडे, कापड, आदी ठेवू नयेत. रिकामे किंवा भरलेले सिलिंडर सुरक्षाकॅप लावल्याशिवाय ठेवू नका.

हेही वाचा >> कमी खर्चात भुवया छान दाट व जाड करण्याचे १० सोपे उपाय; कसा वापर करायचा जाणून घ्या

सुती कपडे वापरा

स्वयंपाकघरात काम करीत असताना अंगावर नेहमी सुती वस्त्र किंवा अग्निप्रतिरोधक अॅप्रन वापरावे. टेरिकॉट, नॉयलॉनसारखे वस्त्र लगेच पेट घेते. गॅस सिलिंडर नेहमी उभे ठेवावे. गॅस संपत आला म्हणजे सिलिंडर आडवे किंवा उलटे करू नका. सिलिंडर व गॅस उपकरणास लहान मुले हात लावणार नाहीत याची काळजी घ्यावी.