Constipation Home Remedies : अनेक जण सकाळी पोट नीट साफ न होण्याच्या समस्येने त्रस्त असतात. यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेतात आणि घरगुती उपायही करून पाहतात, पण तरीही आराम मिळत नाही. अशा परिस्थितीत या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सांगितलेले काही सोपे उपाय करुन पाहू शकता.

सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आणि नाश्ता केल्यानंतर टॉयलेटला जाण्याची सवय लावणे फायदेशीर ठरू शकते. जेवणानंतर आतड्यांची हालचाल वाढते, ज्यामुळे मलत्याग करणे सोपे होते. शौचाच्या वेळी जास्त जोर लावणे टाळा आणि शरीराची नैसर्गिक गरज टाळू नका.

आहारात काय बदल करावेत?

बद्धकोष्टापासून वाचण्यासाठी पपई, पेरू, हिरव्या पालेभाज्या, डाळी, ओट्स आणि तृणधान्ये यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. याशिवाय दिवसभरात पुरेसे पाणी प्या आणि रोज २० ते ३० मिनिटे चाला. या सवयींमुळे मल मऊ राहतो आणि आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर बद्धकोष्टाचा त्रास सतत होत असेल किंवा घरगुती उपायांनी बरा होत नसेल, तर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टचा सल्ला नक्की घ्या. मलामधून रक्त येणे, तीव्र पोटदुखी, उलट्या होणे किंवा पोट फुगून मल आणि गॅस अजिबात न होणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीची शौचास जाण्याची वेळ वेगवेगळी असू शकते; महत्त्वाची गोष्ट म्हणजे मलत्याग विनासायास आणि वेदनेशिवाय झाला पाहिजे.