श्रावण म्हणजे सणांचा, व्रत-वैकल्यांचा महिना! म्हणूनच या महिन्यामध्ये अनेक जण मांसाहार करत नाहीत. त्यामुळे, हा श्रावण महिना पाळणारे मांसाहारप्रेमी तो सुरु होण्यापूर्वी म्हणजेच आषाढाच्या शेवटच्या दिवशी मांसाहारावर मनसोक्त ताव मारून घेतात आणि गटारी साजरी करतात. या दिवसाला आषाढ अमावस्या किंवा गटारी अमावस्या असंही म्हटलं जातं. आपण आपले मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय यांच्यासोबत हा गटारीचा दिवस अगदी मजेत घालवतो. यंदा गटारी आज म्हणजेच रविवारी आहे. त्यामुळे खरंतर अनेकांकडे काल पासूनच जंगी तयारीला सुरुवात झाली असेल. तुमचाही बेत ठरलाच असेल, नाही का? आज जर तुम्ही खासकरून मटणाचा बेत केला असेल तर  आम्ही तुम्हाला अत्यंत चविष्ट, चमचमीत आणि सोप्या मटण रिसिपीज सांगणार आहोत. तेव्हा, यंदाची गटारी जरा आणखी स्पेशल  होऊ द्या.

१) मटण चॉप्स फ्राय

साहित्य :

balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
Viral wedding photoshoot of bride working out in a park in Traditional wedding lehenga netizen say her Tiger Shroff female version
“लेडी टायगर श्रॉफ!”, चक्क लग्नाच्या लेहेंग्यात नवरी करतेय व्यायाम, हटके फोटोशूट पाहून चक्रावले नेटकरी; Video एकदा बघाच
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर

१ किलो मटण चॉप्स, २ चमचे आलं-लसूण पेस्ट, २ चमचे मिरची-कोथिंबीर पेस्ट, २ चमचे गरम मसाला, १ चमचा हळद, २ अंडी, अर्धा कप ब्रेडचा चुरा, चवीपुरतं मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती :

मटण चॉप्सला हळद-मीठ लावून थोडासा पाण्याचा हबकारा मारून कुकरमध्ये शिजवून घ्या. ३ शिट्टय़ा होऊ द्या. आता आलं-लसूण, मिरची कोथिंबीर, गरम मसाला एकत्र करून हे मिश्रण शिजलेल्या मटण चॉप्सना लावून घ्या आणि ते अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. आता एका भांडय़ात अंडी फेटून घ्या. एका भांडय़ात ब्रेडचा चुरा ठेवा. तळण्यासाठी तेल गरम करा. मसाला लावलेले मटण चॉप्स अंडय़ात बुडवून आणि ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून घ्या. मस्तपैकी तळून घ्या. मटण चॉप्स फ्राय तयार आहेत.


२) मटण घी रोस्ट

साहित्य

१ किलो मटण, ३ चमचे साजूक तूप, २ चमचे आलं-लसूण पेस्ट, अर्धा चमचा लिंबाचा रस, कढीपत्त्याची थोडी पाने, २ चमचे दही, पाव कप तूप, चवीनुसार मीठ, चेट्टीनाड मसाला.

चेट्टीनाड मसाल्याचं साहित्य –  १० काश्मिरी मिरच्या, १ चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशोप, पाव चमचा काळी मिरी, १ इंच दालचिनी, ४ लवंगा, १ चक्री फूल.

कृती :

आधी चेट्टीनाड मसाला तयार करून घ्यावा. त्यासाठी एका भांडय़ात मिरच्या, धने, जिरे, बडीशोप, मिरी, लवंग, दालचिनी आणि चक्रीफूल हे सारे मसाले कोरडेच भाजून घ्यावी. त्यानंतर ते गार झाल्यावर त्याची पूड बनवावी. आता ही चेट्टीनाड मसाल्याची पूड, आले-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी.

आता कुकरमध्ये ३ चमचे तूप घालून ते गरम करावं. त्यात आले-लसूण पेस्ट आणि मटण घालून चांगलं परतावं. आता यात चवीपुरतं मीठ घालून त्यात थोडंसं पाणी घालावं. कुकरचं झाकण लावून ४ शिट्टय़ा कराव्यात आणि मटण मऊ होईल असं शिजवून घ्यावं.

कढईमध्ये उरलेलं तूप गरम करून त्यावर वाटलेलं ओल्या चेट्टीनाड मसाल्याचं मिश्रण परतावं. मग त्यावर दही घालून त्यात मटणाचं वरचं पाणी घालून चांगली उकळी आणावी. हा वास घमघमू लागला की मग त्यात शिजवलेलं मटण घालावं. मटण घी रोस्ट तयार आहे.


३) ग्रीन करी मटण

साहित्य :

१ किलो मटण. वाटणासाठी – अर्धा किलो कांदे, आलं (४ ते ५ छोटे तुकडे), एका लसणीच्या पाकळ्या,
७ ते ८ हिरव्या मिरच्या, १ वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा खसखस, ५ लवंगा, ८ काळी मिरी, ५ दालचिनीचे तुकडे, २ चमचे बडीशेप, जायफळाचा तुकडा, १ वाटी तूप, फोडणीसाठी २ लवंग, दालचिनीचे २ तुकडे, २ वेलची, १ वाटी ओल्या खोबऱ्याचा रस

कृती

तूप तापवून त्यात लवंग, वेलची, दालचिनी घालून कांदा घालावा. वाटलेल्या मसाल्याची गोळी मटणाला लावून ठेवावी. कांदा चांगला परतला गेल्यानंतर त्यात मटण घालून व्यवस्थित परतावं. नंतर थोडी हळद, मीठ आणि पाणी घालून शिजवावं. शेवटी खोबऱ्याचा रस घालावा. मटणाला आवश्यक एवढाच अंदाजे रस ठेवावा. कूकरमध्ये शिजवायचं असेल, तर ३ शिट्ट्या कराव्यात. तुमचं ग्रीन करी मटण तयार आहे.


) सुकं मटण

साहित्य :

अर्धा किलो मटण, १ चमचा हळद, बारीक चिरलेला १ कांदा, किसून तळून वाटलेलं अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धा मोठा चमचा आलं लसणाचं वाटण, २ मोठे चमचे लाल तिखट (४ लवंगा, ३ दालचिनी तुकडे, २ वेलदोडे, ५ मिरी, २ चमचे जिरे आणि धणे तव्यावर भाजून त्याची कुटून पूड करा), तेल अर्धी वाटी.

कृती :

मटणाला हळद, मीठ, तिखट, धणे-जिरे पूड, आलं लसूण वाटण लावून शिजवा. कढईत तेल घ्या. त्यात चिरलेला कांदा टाकून परता. त्यात खोबरं कांदा वाटून टाका. कुटलेला गरम मसाला पूड टाकून परता व शिजलेले मटण टाका, वरून लाल तिखटही टाका.


) मटण काळा रस्सा

साहित्य :

१ किलो मटण, २ मोठे चमचे बारीक करुन घेतलेला तळलेला कांदा, २ मोठे चमचे आलं-लसूण पेस्ट, १ वाटी भाजून बारीक वाटलेले तीळ, १ वाटी तेल, अर्धा चमचा हळद, मीठ चवीनुसार, २ मोठे चमचे ‘मराठा गरम मसाला’, अर्धी वाटी कापलेली कोथिंबीर, १ लिंबाचा रस

कृती :

मटण स्वच्छ धुऊन घ्या. त्याला आलं-लसूण वाटण, हळद, मीठ, लिंबू लावून ठेवा. कढईत तेल घ्या. वाटलेला कांदा आणि आलं-लसूण वाटण टाका. वाटलेले तीळ टाकून परतून घ्या. मटण टाका. गरम मसाला टाका. १०-१२ वाटय़ा पाणी टाका. मटण व्यवस्थित शिजू द्या. शिजल्यावर कोथिंबीर टाका.