Genetic Testing: आजच्या धकाधकीच्या जीवनात कधी कधी आपण रोजच्या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. अशा अनेक आरोग्य चाचण्या आहेत ज्या आपण करून घेतल्या पाहिजेत. या आरोग्य चाचण्यांमुळे तुमच्या शरीरात असलेल्या कमतरतेबद्दल योग्य वेळी कळू शकते. जे जाणून घेतल्यास तुम्ही वेळीच अनेक आजारांना बळी पडण्यापासून वाचू शकता. आज आम्ही तुम्हाला जेनेटिक टेस्टबद्दल सांगणार आहोत.

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

जेनेटिक टेस्ट आवश्यक का आहे?
असे अनेक आजार आहेत जे आरोग्य चाचणीद्वारे वेळेत शोधले जाऊ शकतात आणि त्यावर उपचार देखील शक्य आहेत. जेनेटिक टेस्ट देखील एक अतिशय महत्त्वाची चाचणी मानली गेली आहे. जेनेटिक टेस्टने तुम्ही तुमच्या न जन्मलेल्या बाळाला अनेक आजारांपासून वाचवू शकता.

मुलामध्ये आई आणि वडील दोघांची जनुके असतात
गरोदरपणात काही चाचण्या केल्या तर बाळाला अनेक आजारांपासून वाचवता येईल, असे डॉक्टरांचे मत आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार, गर्भात वाढणारे मूल आई आणि वडिलांच्या जनुकांच्या संयोगाने तयार केले जाते. आई आणि वडील दोघांची जनुके मुलामध्ये असतात.

मुलांचे अनुवांशिक रोगांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे
आता तुम्ही विचार करत असाल की आपण जीन्सबद्दल का बोलत आहोत. कारण आई-वडिलांमध्ये जर काही आजार असेल तर ते मूलामध्ये सुद्धा उतरण्याची शक्यता असते. या समस्यांपासून मुलाचे संरक्षण करण्यासाठी जेनेटिक टेस्ट करणं खूप महत्वाचं आहे. जेणेकरून अनुवांशिक आजार मुलामध्ये येऊ नयेत.

अनुवांशिक रोगांचे निदान करता येते
जेनेटिक टेस्टमुळे शरीरात उद्भवणाऱ्या अनुवांशिक रोगांची स्थिती जाणून घेतली जाते. जर कमतरता लवकर लक्षात आली तर डॉक्टर थोड्या उपचाराने बरे करू शकतात.

गर्भधारणेदरम्यान ही चाचणी आवश्यक आहे
जनुकीय चाचणीच्या माध्यमातून पालक येणाऱ्या पिढीला वाचवू शकतात. जेनेटिक टेस्ट, प्रसवपूर्व चाचणी, नवजात मुलांची तपासणी, IVF उपचारादरम्यान गर्भामध्ये उपस्थित असलेल्या अनुवांशिक परिस्थितीचा सहज शोध घेण्यास सक्षम करते. जन्मलेल्या मुलाचे अनुवांशिक विकारांपासून संरक्षण करण्यासाठी अनुवांशिक चाचणी केली जाते.

पुरुषांनी जेनेटिक टेस्ट करणे आवश्यक आहे
या चाचणीद्वारे पुरुषांमधील हृदयाशी संबंधित गंभीर स्थिती सहजपणे शोधल्या जातात. जेनेटिक टेस्टमुळे जनुकांमधील बदल शोधता येतात. या चाचणीनंतर, तुम्ही तुमच्या मुलांमधील भविष्यातील आजारांबद्दल आधीच जागरूक होऊ शकता.

जेनेटिक टेस्टचे फायदे
जेनेटिक टेस्टद्वारे पुरुषांच्या वंध्यत्वाबद्दल माहिती मिळू शकते. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की जेनेटिक टेस्ट प्रत्येकासाठी आवश्यक नाही. कुटुंबात रोगाचा इतिहास असल्यास, ही चाचणी डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर करणे आवश्यक आहे.