सध्या बहुतेकजण स्प्लिट एन्ड्सच्या समस्येने त्रस्त आहेत. वाढते प्रदूषण, चुकीचा आहार आणि केसांची योग्य काळजी न घेणे यामुळे अनेकदा केसांना फाटे फुटण्याची समस्या उद्भवते. स्प्लिट एन्ड्समुळे केस कोरडे होतात आणि गळू लागतात. फाटलेल्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण महागड्या केसांची काळजी घेणारी उत्पादने वापरतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते, घरगुती उपायांनीही या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.

स्प्लिट एन्ड्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरी बनवलेल्या ओव्हरनाइट हेअर मास्कची मदत घेऊ शकता. रतनजोत पावडर, आवळा पावडर आणि खोबरेल तेल मिक्स करून हेअर मास्क बनवू शकता

Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
13 year old use Alexa to protect from money attack vrial
Alexa चा सर्वात भन्नाट उपयोग; १३ वर्षांच्या मुलीने जीव वाचवण्यासाठी दिली अशी कमांड की बघूनच व्हाल थक्क
IPL 2024 Vi announces deals For Customers To Watch favourite tournaments With special Recharge offers
IPL 2024: आयपीएल पाहण्यासाठी Vi चे बेस्ट प्लॅन्स; मोफत डेटा अन् आकर्षक डिस्काउंट… ‘या’ ग्राहकांना घेता येणार लाभ

रात्रभर केसांचा मास्क असा बनवा:

केसांचा मास्क बनवण्यासाठी लोखंडी कढईत एक चमचा खोबरेल तेल घ्या. नंतर त्यात १५ कढीपत्ता घाला. आता त्यात एक टेबलस्पून आवळा पावडर, एक टेबलस्पून रजतजोत पावडर घालून रात्रभर असेच राहू द्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री हे तेल चाळणीतून गाळून गरम करावे. नंतर डोक्याला चांगले लावा. या व्यतिरिक्त तुम्ही हे तेल केसांच्या मुळापासून टोकापर्यंत चांगले लावा. हा हेअर मास्क रात्रभर तसाच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पूने केस चांगले धुवा. तुम्ही हा केसांचा मास्क आठवड्यातून दोनदा वापरू शकता. यामुळे तुम्हाला स्प्लिट एंड्सपासून मुक्त मिळू शकते.

रजतजोत पावडर

रजतजोत पावडरमध्ये लक्षणीय प्रमाणात जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात. दरम्यान तुम्ही केसांचा मास्क बनवताना रजतजोत पावडर वापरल्याने आणि हे केसांमध्ये लावल्यानेही पांढरे केस काळे होऊ शकतात.

आवळा पावडर

आवळा पावडर केसांसाठी खूप फायदेशीर आहे. हे केसांची वाढ वाढवण्यास मदत करते, याशिवाय ते स्प्लिट एंड्सपासून देखील मुक्तता मिळते. आवळा हा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या केसांचे संरक्षण करतो. विशेष म्हणजे घरी बनवलेल्या या हेअर मास्कचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.

(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)