scorecardresearch

Home Remedies: स्ट्रेच मार्क्सवर खर्च करताय हजारो रुपये? आजीच्या बटव्यातील ‘हे’ उपाय आहेत स्वस्तात मस्त

स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी हजारो रुपयांची क्रीम लोशन लावून पैसे घालवण्याची गरज नाही

Home Remedies: स्ट्रेच मार्क्सवर खर्च करताय हजारो रुपये? आजीच्या बटव्यातील ‘हे’ उपाय आहेत स्वस्तात मस्त
स्ट्रेच मार्क्सवर घरगुती उपाय (फोटो: जनसत्ता)

तुम्ही अलीकडेच वजन कमी केलंय का? किंवा तुमच्या घरात कुण्या नव्या पाहुण्याचं आगमन झालंय का? मुख्यतः हे दोन आनंदी क्षण अनुभवताना तुमच्या शरीरातील काही बदल तुम्हाला नकोसे वाटू शकतात. जसे की स्ट्रेच मार्क! गर्भारपणात किंवा वजन वाढलेले असताना त्वचा ताणली जाते व स्ट्रेच मार्क पडतात. तुमचे वजन पुन्हा पूर्वी सारखे झाले की हे स्ट्रेच मार्क अधिक ठळक दिसू लागतात. हे स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी हजारो रुपयांची क्रीम लोशन लावून पैसे घालवण्याची गरज नाही. लक्षात घ्या मुळात हे बदल तुमच्या हिंमतीला निसर्गतः मिळालेली शाबासकी आहेत आणि त्यामुळे खजील होऊ नका उलट तुम्ही आजीच्या बटव्यातील काही घरगुती उपाय करून हे स्ट्रेच मार्क हटवू शकता.

स्ट्रेच मार्क्स कमी करण्याचे घरगुती उपाय

लिंबाचा रस

लिंबामध्ये निसर्गतः ऍसिडिक ब्लिचिंगचे गुण असतात त्यामुळेच तुम्ही त्वचेवर ज्या ठिकाणी स्ट्रेच मार्क आहेत तिथे लिंबाची फोड चोळू शकता. शक्य झाल्यास उकडलेली लिंबाची फोड घ्या जेणेकरून त्वचेची जळजळ होणार नाही.

बटाटा

बटाट्यामधील स्टार्च मुळे त्वचेला ग्लो मिळतो तसेच हे स्टार्च सुद्धा एक प्रकारे ब्लिच म्हणून काम करतात. त्वचा खेचली गेल्याचे निशाण हटवण्यासाठी बटाट्याचा रस किंवा बटाट्याचे काप तुम्ही त्वचेवर चोळू शकता. यामुळे काळपटपणा जाऊन त्वचा स्वच्छ सुद्धा होते.

अंडी

अंड्याचे पांढरे द्रव हे प्रोटीन आणि अमिनो ऍसिडचा खजिना आहे. त्वचा खेचली गेल्याने स्ट्रेच मार्क येतात याचा अर्थ तुम्ही वजन पुन्हा मूळ पदावर आल्यावर त्वचा सैल होते परिणामी स्ट्रेच मार्क अधिक स्पष्ट दिसून येतात. अंड्यांमुळे तुम्हाला त्वचा टाइटनिंग करता येते. तसेच हे मार्क हटवण्यात सुद्धा मदत होते.

कोरफड+ आर्गन ऑइल

तुम्हाला अबाजारातून कोरफडीचे जेल आणायची गरज नाही. तुम्ही कोरफडीची एक पात घेऊन त्यातील गर काढून घेऊ शकता. या नैसर्गिक जेल मध्ये आर्गन ऑइल मिसळून मग त्वचेला लावा. या मिश्रणामधील व्हिटॅमिन ई मुळे त्वचा खेचल्याने तुटलेले तंतू पुन्हा ठीक होऊ लागतात व स्ट्रेच मार्क कमी होतात.

(हे हि वाचा: सावधान! टॅटू काढल्याने दोघांना HIV ची लागण, १४ जण पडले आजारी; ‘या’ गोष्टी टॅटू काढताना तपासून घ्या)

हळद

स्ट्रेच मार्क्सवर औषधी गुणधर्मांनी समृद्ध हळदीचा वापर केल्याने बराच फरक दिसतो. हळदीमध्ये पाणी किंवा तेल घालून पेस्ट बनवा आणि दिवसातून दोनदा या स्ट्रेच मार्क्सवर लावा. यामुळे तुमची त्वचा उजळण्यात सुद्धा मदत होते.

(टीप- वरील उपाय नैसर्गिक असले तरी तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करून मग वापरणे उचित ठरेल)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Get rid of stretch marks with all natural remedies watch gharguti upay svs

ताज्या बातम्या