सुंदर केस असणे ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र अनियंत्रित आहार यामुळे केसांवर त्याचा परिणाम होत असतो. तसेच प्रत्येकाला आपले केस काळे आणि दाट राहावेत अशी इच्छा असते. तर एकीकडे कोंड्यामुळे केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. कोरडे वातावरण आणि हिवाळ्यात थंड वारे यामुळे त्वचेची तसेच टाळूची आर्द्रता कमी होऊ लागते. प्रत्येक स्त्रीला तिचे केस मऊ आणि कोंडामुक्त हवे असतात, त्यासाठी अनेकजण सर्व प्रकारची उत्पादने वापरत असतात. त्यात तुम्ही केमिकल प्रोडक्ट्सचा वापर केल्याने केसांना फायदा तर होतोच शिवाय हानीही होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय केले तर तुमचे केस मजबूत, दाट तसेच मऊ आणि कोंडामुक्त होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनसीबीआय (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन) च्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, केसांच्या वाढीसाठी तूप सेवन केल्याने केसगळतीची समस्या दूर होऊन केसांसाठीही फायदेशीर ठरू शकते. एनसीबीआयच्या अहवालानुसार, व्हिटॅमिन-ए आणि ई हे दोन्ही केसांच्या पोषणासाठी आवश्यक पोषक आहेत.

केसांना बनवा मऊ

तूप हे फॅटी ऍसिडचे बनलेले असते, जे त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी पोषण आणि आर्द्रता प्रदान करते. तसेच तुमच्या केसांना तूप लावल्यास तुमचे केस मऊ राहतात. वास्तविक, तुपात व्हिटॅमिन-ए, ई आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. याशिवाय तुपात गुळगुळीत आणि वंगण घालण्याची क्षमता असते, ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.

Health Tips : रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या, हे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

केसांमधील कोंडा करा दुर

केसांमध्ये कोंडा ही एक सामान्य समस्या आहे, मुख्यत्वे मलेसेझिया या बुरशीमुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या निर्माण होते. तुपामध्ये जीवाणू आणि बुरशी या दोन्हीशी लढणारे प्रतिजैविक गुणधर्म असल्याचे मानले जाते. या कारणास्तव तूप केसांना कोंड्याच्या समस्येपासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरते. याशिवाय हिवाळ्यात अनेक आरोग्यदायी चरबीयुक्त पदार्थ बाजारात उपलब्ध असतात. विशेषतः बदाम, शेंगदाणे, अक्रोड, भोपळ्याच्या बिया आणि चिया बियाणे यांचे सेवन केल्याने हे पदार्थ तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. यामुळे तुमच्या आहारात हे आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करून केसांच्या समस्येपासून मुक्ती मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghee can be useful in keeping hair soft and getting rid of dandruff in winter know how scsm
First published on: 16-01-2022 at 10:07 IST