scorecardresearch

Premium

‘या’ नावाच्या मुली बिनधास्त आणि खूप बोलक्या असतात, समाजात स्वतःची ओळख निर्माण करतात

असं म्हणतात की व्यक्तीच्या नावाचा त्याच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रानुसार, नावाच्या पहिल्या अक्षरावरून कोणत्याही व्यक्तीबद्दल बरंच काही कळू शकतं. जाणून घेऊयात सविस्तर…

name-astrology-14

Lucky Name Astrology: असं म्हणतात की व्यक्तीच्या नावाचा त्याच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रानुसार, नावाच्या पहिल्या अक्षरावरून कोणत्याही व्यक्तीबद्दल बरंच काही कळू शकतं. ज्या मुलींचे नाव S अक्षराने सुरू होतात, त्या बिनधास्त आणि मनमौजी स्वभावाच्या असतात. अशा मुली स्वतःच्या धुंदीत आयुष्य जगत असतात. या मुली मैत्री आणि नातेसंबंध खूप चांगल्या पद्धतीने निभवतात. ते आनंदी आणि मैत्रीपूर्ण स्वभावाच्या असतात. त्या खूप मेहनतीही सुद्धा असतात. समाजात अशा मुली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Gunratna sadavarte
“गांधींचे विचार संपले, या देशात आता नथुराम…”, गुणरत्न सदावर्ते बरळले; म्हणाले, “भारताचे तुकडे…”

S अक्षराने सुरू होणाऱ्या नावाच्या मुली निडर आणि धैर्यवान असतात. या मुली खूप बोलक्या स्वभावाच्या असतात. प्रत्येक व्यक्ती त्यांच्याकडे खूप लवकर आकर्षित होतो. त्या अंतःकरणाचे शुद्ध असतात. तसंच अशी मुली शांत स्वभावाच्या असल्या तरी त्यांना राग आला की ते कोणाचेही ऐकत नाहीत. ते कोणतेही काम अतिशय काळजीपूर्वक करतात, त्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त असते.

या मुलींवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहते. त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते. ते खूप महत्त्वाकांक्षी असतात. कठोर परिश्रम करून ते क्षेत्रात चांगल्या पदावर पोहोचतात. ते जे काही काम सुरू करतात ते पूर्ण करण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न असतो. या मुली आपल्या बोलण्याने कोणाचंही मन जिंकतात. ज्यांना ते स्वतःचे समजतात. त्यांच्याबद्दल या मुलींना विशेष आसक्ती असते.

आणखी वाचा : Vivah Panchami 2021: ‘या’ दिवशी लग्न करणारे लोक खूप दुःखी जीवन जगतात, याचे खास कारण पुराणात सांगितले आहे

ते कोणतेही काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने करतात. या नावाच्या मुली कोणाचीही फसवणूक करत नाहीत. ते कोणत्याही विषयावर जास्त विचार करतात, ज्यामुळे ते अनेकदा नाराज होतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता आवडते.

आणखी वाचा : Surya Grahan 2021: या दिवशी असणार वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण; जाणून घ्या वेळ आणि परिणाम

त्यांची लव्ह लाईफ सुद्धा खूप छान असते. ते आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या आनंदाची विशेष काळजी घेतात. ते त्यांचे नाते अत्यंत प्रामाणिकपणे घेतात. या नावाच्या मुली किंचित डॉमीनेट स्वभावाच्या देखील मानले जातात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Girls of this name are very cool and spoken they make their own identity in the society prp

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×