scorecardresearch

Father’s Day 2022: यंदाच्या फादर्स डे ला आपल्या बाबांना भेट म्हणून द्या ‘हे’ खास गॅजेट्स

फादर्स डेच्या निमित्ताने या खास भेटवस्तू देऊन तुमच्या वडिलांना सांगा की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत.

fathers-day 2022 gift ideas
जगभरात जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. (Indian Express)

जगभरात जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावेळी १९ जून रोजी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. आपल्या सर्वांसाठीच आपले वडील खास असतात यात शंका नाही, पण वडिलांवर प्रेम दाखवणारे आणि ते किती खास आहेत हे सांगणारे फार कमी लोक असतात. त्यामुळे या खास दिवशी तुमच्या वडिलांना सांगा की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत.

फादर्स डेच्या निमित्ताने तुम्हालाही तुमच्या वडिलांना त्यांचे महत्त्व सांगायचे असेल, तर तुम्ही त्यांना एक मस्त भेट देऊ शकता. आज आपण अशाच काही गॅजेट पर्यायांबद्दल जाणून घेऊया जे तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकता.

  • स्मार्टवॉच

बाप मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करतो, पण स्वतःचा विचार करत नाही. अशा परिस्थितीत, या फादर्स डेनिमित्त त्याच्या फिटनेसची काळजी घ्या आणि त्याला एक चांगली स्मार्टवॉच भेट द्या. तुम्ही त्यांना बोट वॉच मर्क्युरी भेट करू शकता. बोट वॉच मर्क्युरी (BoAt Watch Mercury) हे रिअल-टाइम तापमान निरीक्षणासह फीचर-पॅक स्मार्टवॉच आहे. मर्क्युरी मल्टिपल स्पोर्ट्स मोडसह येतो.

  • इअरबड्स

या फादर्स डेला बाबांचे जुने इयरफोन बदलून त्यांना नवीन इयरबड्स भेट द्या. रेडमी इअरबड्स ३प्रो मध्ये ड्युअल डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत आणि ३० तासांचा म्युझिक प्लेबॅक देण्याचा दावा कंपनीने केला आहे. Redmi Earbuds 3 Pro ची स्पर्धा OnePlus Buds Z आणि Realme Buds Air 2 शी आहे.

  • पॉवर बँक

ऑफिसचे काम असो किंवा वेळ घालवण्यासाठी गेम खेळणे असो, फोनची बॅटरी लवकर संपते. अशा परिस्थितीत बाबांना पॉवर बँक गिफ्ट देणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. ZOOOK नावाची पॉवर बँक खूप चांगल्या वैशिष्ट्यांसह येते. हा वायरलेस चार्जर १०,००० एमएएच बॅटरीसह येतो. वायरलेस चार्जिंग मोड हे त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि ते अँड्रॉइड, आयओएस दोन्हीशी सुसंगत आहे. तुम्ही ते ऑनलाइन खरेदी करू शकता.

  • सारेगामा कारवां गो

तुमच्या बाबांना जुनी गाणी ऐकायची आवड असेल तर सारेगामा कारवां गो हे यावेळी भेट म्हणून देता येईल. हे ३ हजार रेट्रो गाण्यांसह प्रीलोडेड आहे. त्याची किंमत ३,९९० रुपये आहे. हे अ‍ॅमेझॉनवरून ३,५९० रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. यात FM/AM रेडिओ, स्पीकर आणि हेडफोन कनेक्ट करण्यासाठी ३.५ एमएम ऑडिओ जॅक आहे.

  • ट्रिमर

या फादर्स डे, तुम्ही तुमच्या वडिलांना दाढी ट्रिमर भेट देऊ शकता. Mi Beard Trimmer 1C बद्दल सांगायचे तर, हा ट्रिमर त्याचे आयुष्य खूप सोपे करेल. चांगली गोष्ट म्हणजे हा Mi ट्रिमर फक्त दोन तास चार्ज केल्यानंतर ६० मिनिटांसाठी आरामात ऑपरेट करता येतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-06-2022 at 16:20 IST
ताज्या बातम्या