Goat milk benefits: दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हाडे मजबुत करण्यात दूध मोलाचे योगदान देते. त्यामुळे लहान मुलांना तर त्यांची आई नियमित दूध देते. गाय आणि म्हशीच्या दुधाचा वापर आपल्याकडे सगळ्यात जास्त होतो. अगदी लहान मुलांना देण्यापासून ते चहा, कॉफीसाठी सुद्धा आपण माय आणि म्हशीचेच दूध वापरतो. पण आज आम्ही तुम्हाला एक आगळी वेगळी माहिती याठिकाणी देणार आहोत. गाय आणि म्हशीच्या दुधाऐवजी बकरीचे दूध अधिक लाभकारी आहे. बकरीच्या दुधात अनेक पौष्टिक गुण असतात. जे आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी उपयोगाचे आहेत. जाणून घेऊया बकरीच्या दुधाचे आश्यर्यकारक फायदे…

  • हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले
    बकरीच्या दुधामध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते याचे सेवन केल्याने हृदयाचे आजार दूर होतात. जर्नल ऑफ डेअर सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या २००५च्या एका संशोधनानुसार बकरीचे दूध सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर सुधारतो तसेच खराब कोलेस्ट्रॉलचा कमी होतो.
  • हाडे होतात मजबूत
    बकरीच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. याचे सेवन केल्याने हाडे तसेच दात मजबूत होतात. बकरीच्या दुधामध्ये गायीच्या दुधाच्या तुलनेत कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. यामुळेच बकरीच्या दुधाचे सेवन केल्याने शरीरास भरपूर पोषकतत्वे मिळतात. यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.

आणखी वाचा : Lemongrass: लेमनग्रास आरोग्यासाठी चांगले की वाईट? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…
  • अॅनिमियाचा धोका कमी
    बकरीचे दूध गायीच्या दुधापेक्षा कितीतरी पटीने चांगले असते. यात आयर्नचे प्रमाण अधिक असते त्यामुळे अॅनिमिया सारखे आजार बरे होतात.
  • पचण्यास हलके
    बकरीच्या दुधात फॅटचे प्रमाण कमी असते यामुळे हे सहज पचते. तसेच प्रत्येक वयोगटातील लोक हे दूध पिऊ शकतात.
  • त्वचा राहते हेल्दी
    त्वचेच्या आरोग्यासाठी बकरीचं दूध फायदेशीर मानलं जातं. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनने दिलेल्या माहितीनुसार, हे दूध आपल्या त्वचेसाठी सक्रिय घटक म्हणून काम करतं. बकरीच्या दुधाचा पीएच (PH) अर्थात सामू हा आपल्या त्वचेच्या सामूइतका असतो. त्यामुळे त्वचेचं नुकसान होत नाही. याशिवाय शेळीच्या दुधातलं लॅक्टिक अ‍ॅसिड आणि फॅटी अ‍ॅसिड त्वचा चांगली होण्यासाठी मदत करतं.

आणखी वाचा : Pregnancy Health: गर्भधारणेदरम्यान आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा; बाळाचे आरोग्य राहील सुदृढ

  • वजन नियंत्रणात राहण्यात मदत

निरोगी वजनामुळे अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. बकरीच्या दुधात गायीच्या दुधाइतकेच पोषक घटक असतात; मात्र, या दुधात गायीच्या दुधाच्या तुलनेत कॅलरीज जास्त असतात. त्यामुळे हे दूध वजन वाढण्यासाठी उपयुक्त मानलं जातं. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या मते, लहान मूल अशक्त किंवा कमी वजनाचं असेल तर त्याला शेळीचं दूध पिण्यास द्यावं. यामुळे वजन लवकर वाढतं.

  • केसांसाठी फायदेशीर

बकरीच्या दुधात पोषक तत्वे आणि विविध जिवनसत्वांचा समावेश असतो. त्यामुळे बकरीचे दूध शरीरासाठी फार उपयुक्त आहे. सौदर्य वाढवण्यात सुद्धा बकरीचे दूध योगदान देते. बकरीच्या दुधामध्ये कॅल्शियम, पोटेशियम, व्हिटॅमीन बी २ असते. ज्यामुळे केसातील कोंडा नाहीसा होतो आणि केसाची चमक वाढते. केसगळतीसुद्धा थांबते. त्यामुळे यासाठी बकरीचे दूध विशेष लाभकारी ठरते.